जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 22:27 IST2025-11-22T22:26:44+5:302025-11-22T22:27:15+5:30
डॉ. राधिका यांनी ज्या 'चाय पार्टनर' नावाच्या कॅफेच्या गच्चीवरून उडी घेतली, ते कॅफे याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर आहे.

जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...
गुजरातच्या सूरत शहरात एका २८ वर्षीय महिला फिजिओथेरेपिस्ट डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. डॉ. राधिका असे या डॉक्टरचे नाव असून, त्यांनी सरथाना भागातील एका बिझनेस हब इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. विशेष म्हणजे, राधिकाचे जानेवारी २०२६ मध्ये लग्न आणि साखरपुडा ठरलेला असताना ही घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
डॉ. राधिका यांनी ज्या 'चाय पार्टनर' नावाच्या कॅफेच्या गच्चीवरून उडी घेतली, ते कॅफे याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर आहे. २१ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास डॉ. राधिका कॅफेमध्ये एकट्या आली होती. राधिका यांनी चहाची ऑर्डर दिली. सुमारे २० मिनिटे अगदी सामान्यपणे फोनवर बोलत होती. कॅफेचा कर्मचारी आतमध्ये जाताच तिने रेलिंग ओलांडून खाली उडी मारली.
राधिका ही या कॅफेमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत येत असे. त्याच ठिकाणावरून तिने खाली उडी मारली. यामुळे होणाऱ्या नवऱ्यासोबत काही वाद झाल्याचा संशय पोलिसांना आहे. यामागे मोठे कारण असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. राधिकाने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला यावरून पोलीस तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करत आहेत.