शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:21 PM

मोदी म्हणाले, 'आज कोरोना आपल्या  सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांच्या दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे...

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या 76 व्या अॅपिसोडच्या माध्यमाने देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, 'आज कोरोना आपल्या  सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांच्या दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे, अशा वेळी मी आपल्याशी मन की बातच्या माध्यमाने संवाद साधत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात एक आत्मविशास संचारला होता. मात्र, या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा हादरा दिला आहे.' (Mann ki baat 76th episode PM Narendra Modi on Corona Virus and Corona vaccine)

CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!

मोदी म्हणाले, 'आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्यालाच अधिक प्राधान्य द्यायचे आहे. भारत सरकार संपूर्ण शक्तीनिशी राज्य सरकारांसोबत उभी आहे. राज्य सरकारेदेखील आपले कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नकामोदी म्हणाले, कोरोनाच्या या काळात लशीला किती महत्व आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लशीसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरविण्यात आली आहे, तिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध होणार आहे.

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

तज्ज्ञांचाच सल्ला घ्या -यावेळी मोदींनी देशातील जनतेला आग्रहाची विनंती केली, की आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, तर आपण केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. मी पाहत आहे, की आपले अनेक डॉक्टर्स यासंदर्भात जबाबदारी स्वीकारत आहेत. अनेक डॉक्टर्स सोशल मिडियाच्या माध्यमानेही जनतेला माहिती देत आहेत.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी संवाद -यावेळी मोदींनी काही डॉक्टरांशीही संवाद साधला. तसेच त्यांनाही देशवासीयांशी संवाद साधायला सांगितले. यात, मुंबईच्या लिलावती रुग्णालयाती डॉक्टर शशांक जोशी आणि श्रीनगरचे डॉ. नाविद यानी जनतेशी संवाद साधला.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस