CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:27 PM2021-04-24T22:27:59+5:302021-04-24T22:50:14+5:30

भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. (CoronaVirus )

रुग्णालयांत बेड बरोबरच ऑक्सिजनच्या समस्येने भारतातील कोरोना संकटाने विक्राळ रूप धारण केले आहे. भारतातील अनेक शहरांत ऑक्सीनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा एवढा वाढला आहे, की दिल्लीतील दोन रुग्णालयांतील बेडची संख्याही कमी करावी लागली आहे. अशा संकट काळात एकीकडे अमेरिकेने पाठ फिरवली असतानाच, दुसरीकडे रशियाने मदतीचा प्रस्ताव दिला आहे. (CoronaVirus Russia offered help india covid crisis procuring oxygen concentrators and tanks from moscow)

दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जयपूर गोल्डन रुग्णालयात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक रुग्णालयांत शवागारांमध्येही जागा कमी पडत आहे. स्मशानभूमीवर रांगा लागल्या आहेत. कब्रस्तांनांतही जागा कमी पडू लागली आहे. मात्र ही परिस्थिती केवळ कोरोनामुळे लोक मरत आहेत, म्हणून नव्हे, तर विलाजा अभावीच लोकांचा मृत्यू होत आहे, म्हणून उद्धवली आहे. कारण रुग्णालयांत ऑक्सीजन कमी पडत आहे.

भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतातील सक्रिय केरोनाबाधितांची संख्या 25 लाखांवर गेली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे.

सध्या भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाहाकार माजला आहे. यातच, रशियाने भारताला कोरोना संकटाचा सामना करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाकडून ऑक्सीजन काँसंट्रेटर्स आणि टँक विकत घेण्याचा विचार करत आहे. जर हा प्लॅन आमलात आलाच तर सध्या ऑक्सिजन संकटाचा सामना करत असलेल्या भारताला मोठा दिलासा मिळेल.

महत्वाचे म्हणजे, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने विनंती करूनही अमेरिका लशीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटविण्यावर गप्प आहे, असे असतानाच रशियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. मात्र, अमेरिकेतील शक्तीशाली लॉबीने बायडेन प्रशासनावर भारताला मदद करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

आता रुग्णालये मदत मागण्यासाठी न्यायालयातही जात आहे. यामुळेच रशियाचा ऑक्सीजन पुरविण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्वाचा आहे. दिल्लीतील चार रुग्णालये उच्च न्यायालयात गेले असून त्यांनी न्यायालयाकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे.

तत्पूर्वी, चीननेही भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला मेडिकल सप्लाय करण्यास तयार आहोत, असे चीनने गुरुवारी म्हटले होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतातील मेडिकल ढांचा कमकूवत होऊ लागला आहे.

भारतातील महामारीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी म्हटले होते, की चीन मदतीसाठी तयार आहे. कोरोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे.

तसेच, इम्रान खान यांनी शनिवारी ट्विट करत म्हटले आहे, की 'मी भारतीयांप्रति एकता व्यक्त करू इच्छितो. ते कोरोनाच्या घातक लाटेचा सामना करत आहेत. आम्ही आमच्या शेजारील आणि जगातील कोरोनाने पीडित सर्व लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.' तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे या जागतिक संकटाचा सामना करायला हवा, असेही इम्रान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील एधी फाउंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन.