शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टसाठी मँकेंंझी करणार मदत

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम 20 मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील 100 दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यासाठी 1 ...


पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम 20 मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील 100 दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यासाठी 1 कोटी 60 लाख रूपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिकेने राज्य शासनाने यासंदर्भात घेतलेल्या स्पर्धेपाठोपाठ केंद्र शासनाच्या पहिल्या फेरीतील स्पर्धेतही पुण्याचा समावेश झाला आहे. परंतू खरी स्पर्धा पुढील टप्प्यात आहे. स्पर्धेच्या नियमानुसार पुढील 100 दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत करण्यात येणा-या विकास कामांचा आणि सुविधांचा विस्तृत आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर करायचा आहे. हा आराखडा तज्ज्ञ सल्लागाराकडून तयार करून घेण्यात येणार असून सल्लागार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात मँकेंंझी या संस्थेस काम देण्यात येणार आहे.यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात हा निधी नसल्याने डे्रणेज विभागाच्या निधीतून 1 कोटी 60 लाख रूपये वर्गीकरणाद्वारे देण्यात येणार आहेत.
===============
दुस-या टप्प्यातील स्पर्धेसाठी 60 ते 65 प्रश्नांची प्रश्नावली केंद्र शासनाने तयार केली आहे. त्यानुसार शहरात काय सुविधा देणार याचे नियोजन विकास आराखड्याच्या माध्यमातून सादर करायचे आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 100 शहरांपैकी 20 शहरे यावर्षी योजनेसाठी निवडली जातील. पुढीलवर्षी उवर्रीत 80 शहरांमधून 20 शहरांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातच शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड होण्यासाठी चांगली तयारी करण्यात येईल. तज्ज्ञ सल्लागारांसोबतच शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सूचना घेण्यात येतील- कुणाल कुमार ( महापालिका आयुक्त)