मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:07 IST2025-02-27T18:05:47+5:302025-02-27T18:07:31+5:30

Manipur News: राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 14 दिवसांनी प्रशासनाला मोठे यश.

Manipur news! Rebels in Manipur surrender, return looted weapons | मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली

मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली

Manipur Meitei surrender: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठे प्राप्त झाले आहे. प्रशासनाकडून आत्मसमर्पण आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आदेश व आवाहनाचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या 14 दिवसांनंतर एक मोठे आत्मसमर्पण झाले आहे. ज्या लोकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचे आश्वासन दिले होते ते लोक मोठ्या प्रमाणात लुटलेली शस्त्रे घेऊन परतले आहेत.

'आरामबाई टेंगोळ' चे आत्मसमर्पण
25 फेब्रुवारी रोजी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर 'आरामबाई टेंगोल' या मेईतेई संघटनेच्या सदस्यांनी आज आपले शस्त्र ठेवले.

14 दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू 
मुख्यमंत्री एन बीरेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मणिपूरमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अद्याप नवीन नेत्याचे नाव ठरवले नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र, एन बीरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांनी राज्यातील पक्षाच्या आमदारांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे लवकरच मणिपूरबाबत निर्णय होऊ शकतो.

Web Title: Manipur news! Rebels in Manipur surrender, return looted weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.