शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला करावी लागेल पाणीकपात ढिसाळ नियोजन: टाकळी योजनेत शेवटचे पाणी

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

सोलापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्‍यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे.

सोलापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्‍यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे.
गुरूवारी मंत्रालयात औज बंधार्‍यासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली. उजनी धरणातील पाणीसाठा पाहता पाटबंधारे खात्याला सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी सोडणे परवडणार नाही. अर्धा टीएमसी पाण्यासाठी साडेचार टीएमसी पाणी नदीत सोडावे लागते. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणावर खालावत आहे. सध्याची पातळी पाहता आता पुढील काळात भीमेत पाणी सोडणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेला उपलब्ध पाणीसाठय़ावरून शहराचे पाणी नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधार्‍यात पोहोचण्यास आठ दिवस लागणार आहेत. सध्या औज बंधार्‍याची पातळी 1 मीटरवर आली असून, आठवडाभर पाणी पुरणार आहे.
उजनीतून 14 सप्टेंबर रोजी पाणी सोडल्यास 22 सप्टेंबरपर्यंत औज बंधार्‍यात पाणी पोहोचेल. यादरम्यान पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. याशिवाय औज बंधार्‍यात साठविलेले पाणी 45 दिवस पुरते असे पाटबंधारे खात्याचे मत आहे. पण महापालिकेने चौथा पंप सुरू केल्याने महिनाभर पाणी पुरत आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा विभागाला आता पाणी कपातीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
कोट..
पाणीसाठय़ांची स्थिती पाहता आता कठोर पावले उचलल्याशिवाय पर्याय नाही. उजनीतून पाणी सोडल्यावर किती दिवसात औज बंधार्‍यात येईल, त्यावरून पुढील पाणी नियोजन ठरविले जाईल. तूर्त गणेशोत्सवाची काळजी मिटली आहे.
विजयकुमार काळम-पाटील
आयुक्त, महापालिका
000
इन्फो..
नवीन योजनेची गरज
टाकळी योजनेसाठी पाणी सोडणे पाटबंधारे खात्याला परवडत नाही. महापालिकेला प्राप्त स्थितीत उजनीहून सहाशे कोटी खर्चाची नवीन दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सभागृहाने गेल्या महिन्याच्या सभेत एकमताने ठराव करून या योजनेला मंजुरी दिली आहे. आता शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून सहा महिन्यात काम मार्गी लावण्याचे महापालिकेसमोर आव्हान आहे.