'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:30 IST2025-04-29T13:29:57+5:302025-04-29T13:30:37+5:30

Pahalgam Terrorist Attack zip line operator: बैसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. एका पर्यटकाचा व्हिडीओ आता समोर आला असून, त्यात झिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे. 

Man who chanted 'Allahu Akbar' on NIA's radar; Summons sent after video surfaced | 'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स

'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स

Pahalgam Attack NIA: काश्मीर खोऱ्यातील पहलगामपासून जवळच असलेल्या बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केल्या.  २२ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्हिडीओ आता नव्याने समोर आला असून, त्यात गोळीबाराचा आवाज येत आहे. तर झिप लाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे. आता या ऑपरेटरला एनआयएने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

झिपलाईनवर असताना ऋषी भट या पर्यटकाने हा व्हिडीओ शूट केला होता. यात झिप लाईन ऑपरेटर गोळीबाराचा आवाज ऐकून अल्लाह हू अकबर म्हणत असल्याचे ऐकायला येत आहे. 

वाचा >>२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने संबंधित व्यक्तीलाही समन्स बजावले आहे. त्याचीही या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या भट यांनीच झिप लाईन ऑपरेटरवर संशय असून, त्याची चौकशी केली जायला पाहिजे, अशी मागणी केली होती.  

हाच तो व्हिडीओ ज्यात झिपलाईन ऑपरेटर दिसतोय

गोळीबार झाला, त्यावेळी बैसरन पठारावर असलेल्या ऋषी भट यांनी सांगितले की, आम्हाला दहशतवादी हल्ल्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. मी आनंदात तो व्हिडीओ बनवत होतो. पण, नंतर अचानक गोळीबाराचा आवाज आला. गोळीबार जवळपास अडीच वाजता झाला होता. 

धर्म विचारून गोळ्या झाडत होते

'मी बघितलं की, चार ते पाच जण लोकांना धर्म विचारत होते आणि गोळ्या झाडत होते. झिपलाईनवर जेव्हा मी होतो, तेव्हा झिपलाईन ऑपरेटर शांत होता, पण जसा खालून गोळीबाराचा आवाज आला. तसं तो अल्लाह हू अकबर म्हणू लागला', अस ऋषी भट यांनी सांगितलं. 

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. १७ पर्यटक गोळ्या लागून जखमी झाले. ज्या २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली, त्यापैकी ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. 

Web Title: Man who chanted 'Allahu Akbar' on NIA's radar; Summons sent after video surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.