माणूसकीला काळीमा!, पाच वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन अमानुष हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 11:02 IST2017-12-10T10:59:06+5:302017-12-10T11:02:20+5:30

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाची प्रचिती यावी अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडित मुलगी ही पाच वर्षांची चिमुकली असून तिच्यावर बलात्कार करुन अमानुष हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

Man ki Kalima! Rape of five-year-old Chimukali and inhuman killing | माणूसकीला काळीमा!, पाच वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन अमानुष हत्या

माणूसकीला काळीमा!, पाच वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन अमानुष हत्या

हिसार - पाच वर्षांपूर्वी राजधानीमध्ये थरकाप उडवणाऱ्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाची प्रचिती यावी अशी घटना हरीयानातील हिसारच्या उकलाना गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडित मुलगी ही पाच वर्षांची चिमुकली असून तिच्यावर बलात्कार करुन अमानुष हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेची बातमी परिसरात वाऱ्यासाऱखी पसरताच स्थानिकांनी आक्रोश केला. त्यानंतर संतप्त जमावकडून परिसरातील बाजारपेठ बंद पाडण्यात आली.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती हिसारचे पोलीस उपाधीक्षक जितेंदरकुमार यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीवर बलात्कार करुन तीच्या गुप्तांगामध्ये लाकडी काठी घुसवून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आहे. या मुलीच्या राहत्या घरापासून काही मीटर अंतरावर तीचा मृतदेह आढळून आला आहे. 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 



 



 

Web Title: Man ki Kalima! Rape of five-year-old Chimukali and inhuman killing