शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

धक्कादायक! वाढदिवसाला बोलावून 20 मुलांना ठेवलं ओलीस; सुटकेसाठी एटीएस कमांडो दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 9:47 PM

आरोपीकडून गोळीबार आणि बॉम्बफेक; एक ग्रामस्थ, दोन पोलीस कर्मचारी जखमी

फर्रुखाबाद: मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. गुन्हेगारानं त्याच्या घरात 20 मुलांना आणि काही महिलांना ओलीस ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपीनं दरवाज्याच्या मागून बॉम्बफेक करुन गोळीबारही केला. यामध्ये एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. आरोपीनं बॉम्बफेक केल्यानं एक भिंत कोसळली. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांच्या आणि महिलांच्या सुटकेसाठी दहशतवादविरोधी पथकाच्या कमांडोंना बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. घरात लपलेला आरोपी वारंवार आमदार आणि अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र आरोपीनं कुठलीही मागणी केली नसल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. सुभाष बाथम असं आरोपीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वी काकांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात त्याला तुरुंगवास झाला. मात्र वर्षभरापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक दहा वर्षांची मुलगी आहे. सुभाषनं दुपारी मुलीच्या वाढदिवसाच्या बहाण्यानं गावातल्या लहान मुलांना घरात बोलावलं. आसपास राहणारी मुलं अडीचच्या सुमारास सुभाषच्या घरी पोहोचली. यानंतर सुभाषनं घराचा दरवाजा लावून घेतला. संध्याकाळी ४.३० वाजता एक महिला तिच्या मुलाला नेण्यासाठी सुभाषच्या घरी पोहोचली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं तिला समजलं. तिनं लगेचच याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. मात्र अद्याप पोलिसांना मुलांची सुटका करता आलेली नाही. सुभाष घरातून वारंवार बॉम्बफेक करत आहे. याशिवाय सतत देशी कट्ट्यानं गोळीबारदेखील करत आहे. त्यामुळे पोलिसांना ओलिसांची सुटका करण्यात अडचणी येत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ