काय सांगता? महिन्याला फक्त 6 हजार पगार, आयकर विभागाने पाठवली तब्बल 3.49 कोटींची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:27 AM2020-01-16T11:27:00+5:302020-01-16T12:37:25+5:30

महिन्याला फक्त सहा हजार रुपये पगार असणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने तब्बल 3.49 कोटींची नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

man earning 7 thousand per month got income tax notice to explain transactions of 134 crore rupees | काय सांगता? महिन्याला फक्त 6 हजार पगार, आयकर विभागाने पाठवली तब्बल 3.49 कोटींची नोटीस

काय सांगता? महिन्याला फक्त 6 हजार पगार, आयकर विभागाने पाठवली तब्बल 3.49 कोटींची नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देमहिन्याला फक्त सहा हजार रुपये पगार असणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने तब्बल 3.49 कोटींची नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.रवि गुप्ता असं या तरुणाचं नाव असून आयकर विभागाच्या अचानक आलेल्या नोटीसमुळे तो हैराण झाला आहे. बनावट पॅनकार्ड आणि बनावट सहीद्वारेच फसवणूक करण्यात आल्याचं रविने सांगितलं आहे. 

भोपाळ - मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका तरुणाला आयकर विभागाची नोटीस पाहून धक्का बसला आहे. महिन्याला फक्त सहा हजार रुपये पगार असणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने तब्बल 3.49 कोटींची नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवि गुप्ता असं या तरुणाचं नाव असून आयकर विभागाच्या अचानक आलेल्या नोटीसमुळे तो हैराण झाला आहे. 

रविने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फर्ममध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता त्याला धक्काच बसला. ज्या कंपनीतून बँकेशी एवढा मोठा व्यवहार करण्यात आला ती कंपनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या ऑफिसजवळच असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहेत. गुजरातच्या एका डायमंड ट्रेडिंग कंपनीने हा व्यवहार केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रवि गुप्ता तक्रार दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करू शकतात. रवि भिंड जिल्ह्यातील मोहाना परिसरात राहतात. सप्टेंबर 2011 ते 13 फेब्रुवारी 2012 दरम्यान मुंबईतील एका खासगी बँकेच्या शाखेतून कंपनीच्या खात्यात काही कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली. पॅन कार्ड त्याच्याशीच जोडलेलं आहे अशी माहिती आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

'मी 21 वर्षाचा असेल त्यावेळी हा व्यवहार झाला. 2011 ते 2012  दरम्यान मी मुंबईतही नव्हतो आणि गुजरातमध्येही नव्हतो. त्यावेळी मी एका प्रायव्हेट फर्ममध्ये कामाला होतो आणि मला केवळ सहा हजार रुपये पगार मिळत होता. ही रक्कम कर मुक्त होती. मध्य प्रदेशातील सायबर सेल, महाराष्ट्र पोलीस, पीएमओ आणि आयटीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून टॅक्स रिकव्हरीतून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे' असं रविने म्हटलं आहे. तसेच बनावट पॅनकार्ड आणि बनावट सहीद्वारेच फसवणूक करण्यात आल्याचं रविने सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

Web Title: man earning 7 thousand per month got income tax notice to explain transactions of 134 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.