8 coaches of Mumbai-Bhubaneswar Lokmania Tilak Express derail near Cuttack, 40 injured | लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

ओडिसा : ओडिसा येथील कटकमध्ये असलेल्या नरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 40 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी सलगाव आणि नरगुंडी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मुंबई-भुवनेश्वर या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे आठ डबे रूळावरून घसरून अपघात झाला. या घटनेत जवळपास 40 प्रवासी जखमी झाल्याचे समजते. तसेच, यामधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. याशिवाय, रेल्वे अॅक्सिडेंट मेडिकल व्हॅन घटनास्थळी रवाना झाली आहे. 

दरम्यान, दाट धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, दाट धुक्यामुळे समोर असलेल्या मालगाडीला लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने धडक दिल्याने रूळावरून घसरल्याचेही सांगण्यात येत आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच)
 

Web Title: 8 coaches of Mumbai-Bhubaneswar Lokmania Tilak Express derail near Cuttack, 40 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.