शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भक्ताने केली अशी फसवणूक! दानपेटीत टाकला १०० कोटींचा चेक, पण इतकेच पैसे शिल्लक होते खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:21 IST

हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

विशाखापट्टणम : दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणममधील सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात (Sri Varahalakshmi Narasimha Swamy Temple) एका भक्ताने चक्क देवाची फसवणूक केली. दरम्यान, भक्ताने मंदिराच्या दानपेटीत १०० कोटी रुपयांचा चेक टाकला. हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

भक्ताच्या खात्यात फक्त १७ रुपये शिल्लक रक्कम होती. यानंतर या चेकचा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चेकवर बोड्डेपल्ली राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आढळून आली. मात्र, त्या व्यक्तीने या चेकवर कोणतीही तारीख टाकलेली नाही. दरम्यान, चेक पाहिल्यानंतर देवाची फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते विशाखापट्टणम येथील कोटक महिंद्रा बँकेत असल्याचे समजते.

विशाखापट्टणमचे श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दानपेटीत चेक आढळून आल्यावर त्यांनी तो कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नेला. चेक पाहिल्यानंतरच त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेतील अधिकार्‍यांना देणगीदाराच्या खात्यात खरोखर १०० कोटी रुपये आहेत का? ते तपासण्यास सांगितले.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर प्रशासनाला सांगितले की, ज्या व्यक्तीने चेक जारी केला त्याच्या खात्यात फक्त १७ रुपये आहेत. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर आता मंदिर प्रशासन दानपेटीत १०० कोटींचा चेक देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बँकेची मदत घेणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, जर मंदिर अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा त्या व्यक्तीचा हेतू असेल, तर त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेकडे अपील केले जाऊ शकते. 

टॅग्स :TempleमंदिरAndhra Pradeshआंध्र प्रदेशbankबँकJara hatkeजरा हटके