शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

हिमसागर, लक्ष्मणभोग...राजकीय वैर विसरुन ममता बॅनर्जींनी पीएम मोदींसाठी पाठवले आंबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ममता बॅनर्जींनी पीएम मोदींना स्वादिष्ट आंबे पाठवले आहेत.

Mamata Banerjee Narendra Modi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडतात. राज्यातील प्रश्न असो किंवा केंद्रातील प्रश्न असो, ममता बॅनर्जी अनेकदा पीएम नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर टीका करताना आढळतात. पण, आता ममतांनी सर्व राजकीय मतभेदांना बाजुला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आंबे पाठवले आहेत.

चार किलो आंबे पंतप्रधानांना पाठवले12 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेला अनुसरुन यंदाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयाला हंगामी फळे पाठवली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी आंबे पाठवण्यात आल्या आहेत. या आंब्यात हिमसागर, लक्ष्मणभोग आणि फजली यासह इतर काही जातींचे चार किलो आंबे पंतप्रधान मोदींना पाठवले आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही आंबे पाठवण्यात आले आहेत.

बांगलादेशातही आंबे पाठवले माहितीनुसार, केवळ दिल्लीच नाही तर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही आंबे पाठवले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी आणि ममतांना भेट म्हणून 2,600 किलो आंबे पाठवले होते. बांगलादेशी ट्रकमधून आलेल्या या मालामध्ये प्रसिद्ध 'हरिभंगा' आंब्याच्या 260 पेट्या होत्या. सीएम बॅनर्जी यांनी पारंपरिक प्रथा कायम ठेवत गेल्या वर्षी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आंबे पाठवले होते.

मोदी आणि ममता यांच्यात आंबट-गोड संबंधआपल्या सर्वांना माहित आहे की, पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध आंबट-गोड आहेत. 2019 मध्ये पीएम मोदींनी खुलासा केला होता की, ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजेच्या निमित्ताने त्यांना कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवली होती. मोदींनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, विरोधी पक्षांमध्ये माझे अनेक मित्र आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ममता दीदी अजूनही दरवर्षी माझ्यासाठी एक किंवा दोन कुर्ते निवडतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीMangoआंबा