चपळगावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30

शंभुलिंग अकतनाळ/चपळगाव: अक्कलकोटपासून दहा कि. मी. अंतरावर वसलेल्या चपळगावमध्ये ऐतिहासिक व हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिर कोणत्या सालातील आहे, याबाबत पुरावे नसले तरी त्या मंदिराचे कोरीवकाम मात्र सगळ्यांच्या डोळ्यात भरणारे आहे. देवांनी भूतलावर अवतरून एका रात्रीत मंदिर साकारल्याच्या दंतकथा गावातील वयोवृद्ध मंडळी आज सांगतात.

Mallikarjuna Temple, the historic Hemadpanthi of Chaplangwa | चपळगावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर

चपळगावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर

भुलिंग अकतनाळ/चपळगाव: अक्कलकोटपासून दहा कि. मी. अंतरावर वसलेल्या चपळगावमध्ये ऐतिहासिक व हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिर कोणत्या सालातील आहे, याबाबत पुरावे नसले तरी त्या मंदिराचे कोरीवकाम मात्र सगळ्यांच्या डोळ्यात भरणारे आहे. देवांनी भूतलावर अवतरून एका रात्रीत मंदिर साकारल्याच्या दंतकथा गावातील वयोवृद्ध मंडळी आज सांगतात.
हे मंदिर सोलापूरच्या बाळीवेशीत असलेल्या मल्लिकार्जुन देवालयाच्या बांधणी शैलीतील असून, तिचे शिल्पांकन दगडामध्ये केले आहे. मोठमोठ्या दगडामध्ये कोरीव काम, शिल्पकाम करून रेखीव उभारणी करण्यात आली आहे. दगडी खांबावर रेखीव व सुंदर कोरीवकाम केले आहे. देवालयातील प्रत्येक स्तंभाचे काम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण केले आहे. मंदिरात नंदी असून, त्याच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या असून, त्यात महादेवाची पिंड व भ्रमरांबिका मातेची मूर्ती आहे. मुख्य गाभारा, नंदीच्या समोर मल्लिकार्जुनाची मूर्ती व महादेवाची पिंड आहे. या ग्रामदैवताची यात्रा गुढीपाडव्यानंतर अकराव्या दिवशी सुरू होते. ही यात्रा तीन दिवस चालते. श्रावण, इतर सण-उत्सावाच्या काळात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी रांग लागते.

Web Title: Mallikarjuna Temple, the historic Hemadpanthi of Chaplangwa