Mallikarjun Kharge on PM Modi: मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 13:31 IST2022-11-29T13:30:40+5:302022-11-29T13:31:20+5:30

Mallikarjun Kharge statement: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे.

Mallikarjun Kharge on PM Modi: Mallikarjun Kharge compares PM Modi to Ravana; Strong objection of BJP | Mallikarjun Kharge on PM Modi: मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप

Mallikarjun Kharge on PM Modi: मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप

Mallikarjun Kharge called PM Modi Ravana: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. गुजरातमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर मते मागितल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आणि "तुम्हाला रावणसारखी 100 डोकी आहेत का?" असा प्रश्न केला. यानंतर भाजपने काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार करत काँग्रेस पक्षाने गुजरातच्या सुपुत्राचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांचे वादग्रस्त विधान
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'ते नेहमी स्वतःबद्दल बोलतात. तुम्ही कोणालाच पाहू नका, फक्त मोदींचा चेहरा पाहून मतदान करा. तुमचा चेहरा कितीवेळा पाहायचा. पालिका निवडणुकीत तुमचा चेहरा, विधानसभा निवडणुकीत तुमचा चेहरा, लोकसभा निवडणुकीतही तुमचाच चेहरा. प्रत्येक ठिकाणी तुमचाच चेहरा...तुम्हाला रावणासारखी 100 डोकी आहेत का..?' या वक्तव्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही असे वक्तव्य केले आहे
विशेष म्हणजे, काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पंतप्रधान मोदींवर 'मृत्यूचे व्यापारी' आणि 'चहा विक्रेता' अशा शब्दात टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत, ज्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत.

Web Title: Mallikarjun Kharge on PM Modi: Mallikarjun Kharge compares PM Modi to Ravana; Strong objection of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.