शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्राणायाम करा तणाव पळवा

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

फोटो - रॅपमध्ये

फोटो - रॅपमध्ये
नरेंद्र भुसारी : परीक्षेपूर्व तयारीवर मार्गदर्शन
नागपूर : परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिक तणावात असतात. तणावामुळे परीक्षेची संपूर्ण तयारी झाल्यानंतरही पेपर सोडविताना गोंधळतात. परिणामी निकालात गुणांची टक्केवारी कमी होते. विद्यार्थ्यांनो नियमित अभ्यास करीत असाल, तर टेन्शन घेऊ नका, प्राणायाम करा, रिलॅक्स राहा आणि यशाचा मार्ग सुकर करा, असा मोलाचा सल्ला डॉ. नरेंद्र भुसारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मैत्री परिवार संस्था, एनआरएस मोटिव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगरातील विष्णुजी की रसोई येथे १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेची पूर्वतयारी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव कसा घालवाल, रिलॅक्स होण्याच्या पद्धती, पेपर सोडविण्याच्या पद्धती व वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. परीक्षेच्या काळात कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही म्हणून अभ्यास मन लावून करावा. तरीही अभ्यास झाला नसेल तर जेवढा अभ्यास होईल, तो पूर्ण झाला हे समजून परीक्षा द्यावी. परीक्षेच्या वेळी मित्राबरोबर अभ्यासाच्या तयारीची चर्चा करू नये, त्यामुळे मन विचलित होते, झालेली तयारी विसरल्या जाऊ शकते. पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्रातून थेट घरी जावे, झालेल्या पेपर्स विषयी चर्चा न करता, पुढच्या पेपरची तयारी करावी. अभ्यास करताना, परीक्षेपूर्वी प्राणायाम करून, स्वत:ला तणावमुक्त ठेवता येऊ शकते व अभ्यासही छान होतो, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
परीक्षेला जाताना हलके जेवण घ्यावे, आहारात फळे, सलाद व ज्यूसचा वापर करावा. रात्री उशिरा जेवण करू नये, त्यामुळे आळस येते व अभ्यासात लक्ष लागत नाही. १५ मिनिटात २ ते ३ तासांच्या झोपेचा अनुभव कसा घेता येईल, याचेही तंत्र शिकविण्यात आले.