मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू, शिवलिंग बनवत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 12:22 IST2024-08-04T12:21:55+5:302024-08-04T12:22:19+5:30

श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.

Major accident in Madhya Pradesh; 8 children died when the wall collapsed while making the Shivlinga | मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू, शिवलिंग बनवत होते

मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू, शिवलिंग बनवत होते

केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातून भूस्खलनाने हाहाकार मांडलेला असताना मध्य प्रदेशमधून हृदयद्रावक बातमी येत आहे. सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये भिंत कोसळून आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. 

श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी आठ ते १४ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळली. ही भिंत ५० वर्षे जुनी होती, असे सांगितले जात आहे. 

स्थानिक लोकांनी जखमी मुलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Major accident in Madhya Pradesh; 8 children died when the wall collapsed while making the Shivlinga