चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:43 IST2025-10-11T10:41:55+5:302025-10-11T10:43:39+5:30
चेन्नई विमानतळावर इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला आहे. विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडे गेले होते. वेळीच पायलटच्या लक्षात आले.

चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
चेन्नईविमानतळावर गुरुवारी एक मोठी दुर्घटना टळली. इंडिगोच्याविमानाने उड्डाण घेतल्यानंतर कॉकपिटच्या काचेला तडे गेल्याचे पायलटच्या लक्षात आले. तत्काळ पायलटने एटीसीला माहिती दिली आणि आपत्कालीन लँडिंगची तयारी सुरू केली. विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले. पायलटच्या तत्परतेमुळे ७६ प्रवाशांचे जीव वाचले.
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
इंडिगोच्या विमानाने रात्री ११.१२ वाजता उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच विमानाचे पुन्हा लँडिंग करण्यात आले. विमानात मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पायलटने अत्यंत हुशारीने संपूर्ण घटना हाताळली.
लँडिंगनंतर हे विमान चेन्नई विमानतळाच्या ९५ नंबरच्या रनवेवर उभे करण्यात आले. लगेच कॉकपीटची काच बदलण्याचे काम सुरू करण्यात आले. पण, या काचेला तडा का गेला याची माहिती समोर आलेली नाही.
सुरक्षेसाठी काही तास आधीच झाली होती बैठक
या घटनेच्या काही तास आधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्या आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांसोबत मासिक आढावा बैठक घेतली. या बैठकीत सणासुदीच्या आधी सुरक्षा, कामकाज आणि प्रवासी सेवांचा आढावा घेण्यात आला. मंत्र्यांनी सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आणि विमान कंपन्यांना वाजवी भाडे राखण्याचे आवाहन केले. त्यांनी डीजीसीएच्या टॅरिफ मॉनिटरिंग युनिटला भाडे नियंत्रणाचे काटेकोरपणे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले.