उड्डाणपुलाच्या पिलरवर बस आदळून मोठा अपघात, १३ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:10 IST2025-11-27T15:10:08+5:302025-11-27T15:10:24+5:30
Accident In Jammu: जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला आहे. या मार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत.

उड्डाणपुलाच्या पिलरवर बस आदळून मोठा अपघात, १३ प्रवासी जखमी
जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला आहे. या मार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हरच्या ओव्हर स्पीडिंगमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या आपघाताचा पुढील तपास सुरू आहे.