Mainpuri by Election: भाजपाचा गेम फसला; शिवपाल यादवांनी कार्यकर्त्यांना दिले डिंपलला जिंकवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:51 IST2022-11-16T18:51:38+5:302022-11-16T18:51:47+5:30
उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि सपाने जोरदार तयारी केली आहे.

Mainpuri by Election: भाजपाचा गेम फसला; शिवपाल यादवांनी कार्यकर्त्यांना दिले डिंपलला जिंकवण्याचे आदेश
Mainpuri by Election:उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि सपाने जोरदार तयारी केली आहे. सपाने मुलायमसिंह यादव यांची सून आणि अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून रघुराज सिंह शाक्य मैदानात आहेत. 5 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.
दरम्यान, शिवपाल सिंह यांनी डिंपल यादव यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. बुधवारी इटावाच्या सैफई येथे शिवपाल यादव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर शिवपाल सिंह यादव यांनी डिंपलला पाठिंबा देताना कार्यकर्त्यांना व इतर लोकांना सूनेला मतदान करण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव, शिवपाल सिंह यादव यांना भेटायला जाणार आहेत. यावेळी त्याची पत्नी डिंपलही त्याच्यासोबत असेल. मुलायम सिंह यांचे भाऊ अभय राम यादव हेही या बैठकीला उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा आहे.
तत्पूर्वी, तेज प्रताप यादव यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला होता की, संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. भाजपचे लोक अफवा पसरवत आहेत. डिंपल यांना जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. उद्यापासून शिवपालदेखील प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. मैनपुरीची जनता आमच्यासोबत आहे. आज त्यांनी बैठक घेतली, लवकरच ते प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती तेज प्रताप यांनी दिली.