माहिरा खान अद्यापही 'रईस'मध्ये - रितेश सिधवाणी

By Admin | Updated: October 14, 2016 09:21 IST2016-10-14T09:20:03+5:302016-10-14T09:21:43+5:30

रईस सिनेमामध्ये माहिरा खान असल्याचे निर्माते रितेश सिधवाणीने स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे.

Mahira Khan still in 'Rais' - Ritesh Sidhwani | माहिरा खान अद्यापही 'रईस'मध्ये - रितेश सिधवाणी

माहिरा खान अद्यापही 'रईस'मध्ये - रितेश सिधवाणी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी कलाकारांना विरोध होत असल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सिनेमे, दिग्दर्शक, निर्माते अडचणीत आले आहेत. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'रईस'मध्येही पाकिस्तानी कलाकार माहिरा खान असल्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनातील मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र, सिनेमामध्ये माहिरा खान असल्याचे निर्माते रितेश सिधवाणीने स्पष्ट केले आहे.  नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे. 
 
आणखी बातम्या
 
मनसे आणि शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांना केलेल्या विरोधामुळे सिनेमामधील माहिरा खानचा रोल कापून तिच्या जागी दुस-या अभिनेत्रीला घेतल्याचे माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या वृत्ताचे सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी खंडन केले आहे. 'रईसमधून माहिरा खानचा रोल कापल्याची बातमी आली कुठून हे मला समजत नाही. माहिरासोबत सिनेमाचे शुटिंग पूर्ण झालेले आहे. मी असल्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळतो, कारण जेव्हा कुणी एखाद्या गोष्टीवरुन तर्क काढतात, आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही अफवा पसरवणा-यांना एकप्रकारे व्यासपीठ निर्माण करुन देता, त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे कधीही योग्य',अशा शब्दांत रितेश सिधवाणीने टीका केली आहे. 

Web Title: Mahira Khan still in 'Rais' - Ritesh Sidhwani