महाशिवरात्री जोड--- चिंचोली

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:35+5:302015-02-18T00:13:35+5:30

चिंचोली लिंबाजी : हरहर महादेव, शिवेश्वर भगवान की जय असा जयघोष करीत हजारो शिवभक्तांनी वाकी येथील श्री शिवेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. शिवेश्वर संस्थानने भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांसह बाजारसावंगी, किन्ही, नेवपूर, वाकीसह अनेक भागांतील दिंड्या वाकी येथे दाखल झाल्या होत्या. पहाटे संस्थानचे शिवस्वरूप सद्गुरू नारायणदेव बाबा, नामदेव महाराज, दळवी महाराज, जबलपूरकर स्वामी, विजय पल्लोड महाराज, गोविंद महाराज कलापुरे यांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली. यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवेश्वर मंदिरात शिवभक्तांची रीघ सुरू झाली ती सायंकाळपर्यंत कायम होती.

Mahashivartri couple - Chincholi | महाशिवरात्री जोड--- चिंचोली

महाशिवरात्री जोड--- चिंचोली

ंचोली लिंबाजी : हरहर महादेव, शिवेश्वर भगवान की जय असा जयघोष करीत हजारो शिवभक्तांनी वाकी येथील श्री शिवेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. शिवेश्वर संस्थानने भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांसह बाजारसावंगी, किन्ही, नेवपूर, वाकीसह अनेक भागांतील दिंड्या वाकी येथे दाखल झाल्या होत्या. पहाटे संस्थानचे शिवस्वरूप सद्गुरू नारायणदेव बाबा, नामदेव महाराज, दळवी महाराज, जबलपूरकर स्वामी, विजय पल्लोड महाराज, गोविंद महाराज कलापुरे यांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली. यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवेश्वर मंदिरात शिवभक्तांची रीघ सुरू झाली ती सायंकाळपर्यंत कायम होती.
वाकी देवस्थानकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून मंदिर परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी खेड्यापाड्यातून अनेक भक्त येथे दाखल झाले आहेत. भागवतकार विजयकुमार पल्लोड महाराज यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथा सुरू आहे. रात्री समाजसुधारक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन झाले. बुधवारी ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने यात्रा उत्सावाची सांगता होणार असल्याचे नामदेव महाराज यांनी सांगितले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उंडणगाव : महाशिवरात्रीनिमित्त येथील सर्व महादेव मंदिरांत भाविकांची गर्दी होती. नंगेबाबा मंदिराजवळील महादेव मंदिर, महादेव चौक व ब्राह्मण गल्लीतील मंदिरात भाविकांनी पूजा, अभिषेक केला. यानिमित्त नंगेबाबा मंदिरापासून पालखी काढण्यात आली. जय भोलेनाथ, विविध भजनी मंडळांच्या टाळ-मृदंगाच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

Web Title: Mahashivartri couple - Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.