शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री - जोड

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर : महाशिवरात्री भगवान शंकराचा सर्वात महत्त्वाचा दिवस. मानवी आत्म्याला पवित्र करणारे हे व्रत. हे व्रत केल्यास पापांचा नाश होऊन हिंसकवृत्ती नष्ट होते. हिंदू धर्मात महाशिवरात्री पूजनाला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोक्षधाम घाटावर तर महाशिवरात्रीची यात्राच भरते. शहरातील महाल, तेलंगखेडी येथील प्राचीन शिवमंदिरात अभिषेक, पूजा, महाआरती, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवाबपुरा शिवमंदिर
सकाळी ९ वाजता मंदिरात भगवान शिवचा लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर सुंदरकांड पाठ व भजन, कीर्तन होईल. भाविकांना लस्सी व प्रसादाचे वितरण करण्यात येईल.
सतीधाम, न्यू नंदनवन
महाशिवरात्रीनिमित्त न्यू नंदनवन येथील सतीधाम मंदिरात भगवान शिवचा अभिषेक, महाआरती, भजन-कीर्तन, प्रसादाचे वितरण करण्यात येईल.

श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समिती
रामनगर येथील सिद्धारूढ शिवमंदिर येथे श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समितीतर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात नर्मदा नदीतून मिळालेल्या भगवान चंद्रमौलेश्वरांच्या दुर्मिळ शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. मंदिरात सकाळपासून जप, कीर्तन, रुद्राभिषेक, सद्गुरू चरित्रग्रंथाचे अखंड पारायण होईल. मध्यरात्री रुद्राभिषेक होईल.

कल्याणेश्वर मंदिर, महाल
महाशिवरात्रीनिमित्त महाल परिसरातील कल्याणेश्वर मंदिरात इक्षुरसाने (उसाच्या रसाने) अखंड महाभिषेक करण्यात येईल. सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत अभिषेक करण्यात येईल. वेदमंत्रोच्चारात भाविकांनाही नि:शुल्क इक्षुरसाचा अभिषेक करता येईल.

आर्ट ऑफ लिव्हिंग
महाशिवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दहेगाव येथील विदर्भ आश्रमात सकाळी ९ वाजता महारुद्र पूजा व सायंकाळी सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल महाराष्ट्र गुरव समाज
नवीन सुभेदार लेआऊट, हुडकेश्वर रोड येथील शिवभूमीत अखिल महाराष्ट्र गुरव समाजातर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुधाकर कोहळे यांच्या हस्ते भगवान शिवचा अभिषेक होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.