शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

ब्रॉडबॅण्ड जोडणीत महाराष्ट्र अग्रणी; पश्चिम बंगाल खूपच पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 6:10 AM

महाराष्ट्रातील ४३६८१ गावांपैकी २१९७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने सज्ज असून महाराष्ट्र ब्रॉडबॅण्ड सुविधेत उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ४३६८१ गावांपैकी २१९७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने सज्ज असून महाराष्ट्र ब्रॉडबॅण्ड सुविधेत उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील ३६०९० गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत; परंतु, महाराष्ट्रातील २१७९४ गावांच्या तुलनेत उत्तर प्रदेशला  आणखी ६७१४९ गावे ब्रॉडबॅण्डने  जोडायची आहेत. याच साधा अर्थ असा की, ३१ मार्च २०२२ पर्यंत उत्तर प्रदेशातील ३३ टक्के गावे ब्रॉडबॅण्डने सज्ज आहेत; तर त्या तुलनेत महाराष्ट्रातील ५० टक्के गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत.

गुजरातमध्ये ७५ टक्के, हरयाणात ९० टक्के आणि पंजाबमधील ८८ टक्के गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्यात आली आहेत. यात पश्चिम बंगाल मात्र खूपच पिछाडीवर असून या राज्यातील १० टक्के ग्रामपंचायतीत ही सेवा पोहोचली आहे. दळणवळण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार  दिल्लीतील २२२ पैकी एकही गाव ऑप्टिकल फायबरने जोडलेले नाही. चंदीगडमधील सर्व १२ गावांत ही सुविधा उपलब्ध आहे. हरयाणातील ९० टक्के गावे  ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्यात आली आहेत. ओडिशातील ५१२५४ पैकी फक्त १० टक्के गावेही जोडण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये १० टक्के गावे ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्यात आली आहेत. २०२५ पर्यंत देशभरातील उर्वरित ४,६६,४०३ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्याचे  महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी  निश्चित केले आहे.

१.७२ लाख गावांत फायबर केबल

मार्च २०१६ पासून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम गतीने केले जात आहे. २०१६ मध्ये ६५४७ गावे ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात आली होती.  मार्च २०१८ मध्ये ही संख्या १.०६  लाख गांवापर्यंत पोहोचली होती, तर २०२२ मध्ये अशा गावांची संख्या १.७२ लाखांपर्यंत गेली. भारत नेट प्रोजेक्टअंतर्गत ६ लाख ३८ हजार गावे ब्रॉडबॅण्डने जोडण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. २०२५ पर्यंत  सरकारी योजनांचे शंभर टक्के फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविता यावेत म्हणून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे दळवळण आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना सांगण्यात आले. 

टॅग्स :InternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र