Maharashtra CM:मोदी-शहा यांच्याकडून फडणवीसांचे अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:47 IST2019-11-24T03:47:30+5:302019-11-24T03:47:57+5:30
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Maharashtra CM:मोदी-शहा यांच्याकडून फडणवीसांचे अभिनंदन
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक टष्ट्वीट करून दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमित शहा यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन. मला विश्वास आहे की, हे सरकार विकासाशी तसेच महाराष्ट्राच्या कल्याणाशी निरंतर बांधील राहील. तसेच राज्यात विकासाचा नवा मानक प्रस्थापित करील. भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. नड्डा यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-एनसीपीचे सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाईल.