सोनिया, राहुल, प्रियांका घेणार महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचार सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:11 AM2019-10-05T05:11:37+5:302019-10-05T06:12:48+5:30

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी करतील. उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहा ते १९ आॅक्टोबर दरम्यान गांधी महाराष्ट्रात जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान चालवतील.

 Maharashtra Election 2019 : Sonia, Rahul, Priyanka to hold Elecpatin Camnammmimn in Maharashtra & Haryana | सोनिया, राहुल, प्रियांका घेणार महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचार सभा

सोनिया, राहुल, प्रियांका घेणार महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचार सभा

Next

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी करतील. उच्च पदस्थ सूत्रांनुसार दहा ते १९ आॅक्टोबर दरम्यान गांधी महाराष्ट्रात जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान चालवतील.

पक्ष सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रात पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी दोन्ही राज्यांत एक किंवा दोन प्रचार सभा घेतील. पक्षाचा प्रयत्न आहे की सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा शरद पवार यांच्यासोबत व्हाव्यात. परंतु, अजून याबाबत काही निर्णय झालेला नाही.

पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील महाराष्ट्रात जेथे राहुल गांधी व सोनिया गांधी जाऊ शकणार नाहीत तेथे प्रचार करतील. विदर्भ आणि नागपूर शहरात प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी पाठवण्याची सूचना पक्षाच्या काही नेत्यांनी पक्ष श्रेष्ठींना केली होती. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे.

प्रचारासाठी आता मर्यादित वेळ असल्यामुळे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते या दोन्ही राज्यांत विभागनिहाय नियोजन करीत आहेत. त्यात एक मोठा नेता त्या क्षेत्रात प्रचार करू शकेल.

महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मुंबईत या नेत्यांकडून प्रचार होईल असे नियोजन होत आहे. येत्या दोन दिवसांत सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या प्रचार कार्यक्रमाला अंतिम रूप दिले जाईल. पक्षाची स्थानिक शाखा त्या कार्यक्रमानुसार आपल्या मतदारसंघात तयारी करू शकेल.

या तीन नेत्यांशिवाय पक्षाचे इतरही नेते प्रचारास जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, हरीश रावत आदींची नावे आहेत.

निवडणुकीनंतर निरूपम यांना नोटीस

बंडखोरीची लक्षणे दिसलेल्यांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्टÑ आणि हरियाणात बंडखोरीची लक्षणे दाखवलेले संजय निरूपम आणि अशोक तंवर यांना निवडणूक संपल्यानंतर कारणे दाखवा नोटीस दिली
जाईल.
संजय निरूपम यांना पक्ष प्रवक्ते मनीष तिवारी यांनी संयम राखून अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तिवारी यांनी विचारले की, निरूपम आज जे बोलत आहेत ते त्यांनी यापूर्वीच का सांगितले नाही? ते जे काही करीत आहेत त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल.
निरूपम यांनी आपल्या कल्पनांना आवर घालावा. निरूपम आणि तंवर यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

 

Web Title:  Maharashtra Election 2019 : Sonia, Rahul, Priyanka to hold Elecpatin Camnammmimn in Maharashtra & Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.