Maharashtra Election 2019: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांसमोर आशिष देशमुखांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:56 IST2019-10-03T21:56:17+5:302019-10-03T21:56:49+5:30
तर नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Election 2019: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांसमोर आशिष देशमुखांचे आव्हान
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 19 जणांची चौथी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिल्लोडमधून प्रभाकर पालोडकरऐवजी कैझर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर ओवळा माजिवाडा - विक्रांत चव्हाण, कणकवली - सुशील अमृतराव राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress releases list of 19 candidates for #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/Oq10tscneK
— ANI (@ANI) October 3, 2019