शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:54 AM

Maharashtra Election 2019: यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : यावर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने १५७ मद्य, अंमली पदार्थ, शस्त्रे व मूल्यवान वस्तू व रोकड धरून १५७ कोटी रुपये हस्तगत केले. गेल्या म्हणजे २0१४ च्या तुलनेत ही रक्कम पाचपट आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीच्या प्रचार काळात ६0 कोटी ६९ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. याशिवाय ३३.४0 कोटी रुपयांचे मद्य, १९ कोटी ५२ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तसेच शस्त्रे जप्त करण्यात आली. याखेरीज ५३ कोटी ३२ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि सोेने-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.

महाराष्ट्रात २0१४ साली ३0 कोटी रुपये किंमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आम्ही खास व्यवस्था ठेवली होती. मतदारांवर उमेदवारांनी प्रभाव वा दबाव टाकू नये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्यासाठी राज्यात ११२ निरीक्षक नेमले होते. त्याशिवाय २९५ सहाय्यक निरीक्षक, १५६७ फिरती पथके, १६५८ दक्षता पथके नेमली होती.

याखेरीज ४७७ व्हिडीओ पथकेही सक्रिय होती. उमेदवारांचा रोजच्या रोज हिशेब पाहण्यासाठी २९५ पथके काम करीत होती. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे सा' घेण्यात आले. राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन केले होते.

हरयाणात २४.१७ कोटी जप्त

हरयाणामध्ये याच काळात ९.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय ११ कोटींचे मद्य, ३. ९४ कोटींचे अमली पदार्थही ताब्यात घेण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ८.१ कोटी रुपये किमतीची रोकड व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानharyana election 2019हरियाणा निवडणूकPoliceपोलिस