शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या राष्ट्रीय टारगेट बॉलमध्ये महाराष्ट्र अजिंक्य

By admin | Updated: November 2, 2014 00:17 IST

यजमानांना दुहेरी मुकुट

यजमानांना दुहेरी मुकुट नाशिक - टारगेट बॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टारगेट बॉल फेडरेशनच्या वतीने आयोजित पहिल्या सब ज्युनिअर टारगेट बॉल राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपदावर यजमान महाराष्ट्राने पहिले नाव कोरले़ महाराष्ट्राच्या मुले तसेच मुली या दोन्ही संघांनी रोमहर्षक खेळ करत आपल्या गटात विजेतेपद पटकावले़ शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आज अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना पश्चिम बंगालशी झाला होता़ महाराष्ट्राने ४ गोलने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर उत्तर प्रदेशने तेलगंणाचा ३ गोलने पराभव क रत अंतिम फेरी गाठली होती़ अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन गोलने सामना जिंकला़ उत्तर प्रदेशला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले़ या सामन्यात महाराष्ट्राच्या कुणाल पवार, अर्षद शेख, मयुर बोरसे, कल्पेश पाटभल, हेमंत चौधरी, धनंजय आढाव, गेणश गवळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले़ तिसरे स्थान तेलंगणाला नमवत पश्चिम बंगालने राखले़ महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत बिहारच्या संघाचा १० गोलने पराभव करत एकहाती सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले़ यामध्ये आश्विनी सूर्यवंशी, सेजल लोमटे, निशा माळी, पल्लवी सुरशे यांनी उत्कृष्ट खेळ केला़ मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडूचा किताब आश्विनी सूर्यवंशी हिने पटकावला, तर मुलांच्या गटात नंदुरबारचा कुणाल पवार याला हा पुरस्कार मिळाला़ या स्पर्धेतून देशाचा संघ निवडण्यात येणार असून, भुतान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय टारगेट बॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे़ महापौर अशोक मुर्तडक व उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले़ यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती ॲड़ नितीन ठाकरे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ़ सुनील ढिकले, राज्य टारगेट बॉल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दायमा, प्रा़ दिलीप धोंडगे, सोनू शर्मा, साहेबराव पाटील, मीनाक्षी गायधनी, एस़ एम़ कोर, संजय होळकर, अनिल वर्पे, मयुर ठाकरे आदि उपस्थित होते़ फोटो क्रमांक - 01पीएचएनओ11फोटो ओळी - विजेत्या महाराष्ट्राच्या संघाला पारितोषिक देताना महापौर अशोक मुर्तडक, ॲड़ नितीन ठाकरे, राहुल ढिकले़ समवेत संघटनेचे पदाधिकारी़