शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महंत परमहंस दास यांचे बेमुदत उपोषण, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 13, 2020 13:57 IST

मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Ayodhya)

ठळक मुद्देमुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे - महंत परमहंस दास पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे - महंत परमहंस दास 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते.

अयोध्या - तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास हे सोमवारपासून बेमुदत उपोशणाला बसले आहेत. उपोषणाला बसत त्यांनी सरकारकडे भारतालाहिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करण्यात यावे. तसेच मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे आणि पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंनाभारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. परमहंस दास यांनी यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस बेमुदत उपोषण केले आहे.

कोण आहेत परमहंस दास -परमहंस दास हे अयोध्येत राहतात. ते तपस्वी छावनीचे महंत आहेत. मुस्लिमांवरील वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ऑक्टोबर 2018मध्ये संत परमहंस यांनी अनेक दिवस राम जन्मभूमीसाठी बेमुदत उपोषण केले होते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. प्रशासनानेही अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर उपोषणाच्या सातव्या दिवशी पोलिसांनी त्यांना बळजबरीनेच आजारपणाचा हवाला देत उचलले होते आणि पीजीआयमध्ये दाखल केले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून आणि ज्यूस देऊन त्यांचे उपोषण संपवले होते.

चिता रचून आत्मदहन करण्याचीही केली होती घोषणा - परमहंस दास यांनी तपस्वी छावनी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा केली होती. ते 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता तयार करून आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने महंत परमहंस दास नाराज होते. मात्र, दोन दिवस आधीच परमहंस यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना, सीजीएम न्यायालयातही दाखल करण्यात आले होते. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश