शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात मुलायम, लालू आणि नितीश यांचा 'महामोर्चा'

By admin | Updated: November 6, 2014 15:51 IST

समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल संयुक्त या तिघांनी केंद्र सरकारविरोधात 'महामोर्चा' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात प्रभाव वाढत असल्याने दुभंगलेला जनता दल आता एकत्र आला आहे. समाजवादी पक्ष,  राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल संयुक्त या तिघांनी केंद्र सरकारविरोधात 'महामोर्चा' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव दिवसेगणिक वाढत असून हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याचे परिणामही दिसून आले आहे. आगामी वर्षांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त या तिन्ही पक्षांचे धाबे दणाणले आहेत. भाजपाविरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे तिन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत. 
शुक्रवारी दिल्लीत मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लालूप्रसाद यादव, जदयूचे नेते शरद यादव, नितीश कुमार, जनता दल सेक्युलरचे नेते एच. देवेगौडा  हे उपस्थित होते. हे सर्व पक्ष पूर्वी जनता दलाचे भाग होते. आता मोदींच्या विरोधात लढा देण्यासाठी या सर्वांनी मिळून 'महामोर्चा' सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भविष्यात सर्व सुरळीत राहिले तर सर्व पक्षांचे विलीनीकरण करुन नव्याने जनता दलाची निर्मिती होऊ शकेल असे सूचक विधान या पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. 
काळा पैसा, बेरोजगारी आणि शेतक-यांचे प्रश्न या तिन प्रमुख मुद्द्यांवरुन आम्ही मोदी सरकारला धारेवर धरु अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करु असे त्यांनी आवर्जून सांगितले.