PM मोदींचा पुतण्या कुंभमेळ्यात तल्लीन; मित्रांसोबत गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 17:44 IST2025-01-19T17:44:08+5:302025-01-19T17:44:54+5:30
व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ पंकज मोदी आणि पुतणे सचिन मोदी दिसतात.

PM मोदींचा पुतण्या कुंभमेळ्यात तल्लीन; मित्रांसोबत गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल...
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्या साधू-संतांसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही कुंभमेळ्यात येऊन पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदीदेखील आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी यावेळी मित्रांसोबत संत कबीरांची भजने गायली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे पुतणे असूनही सचिन मोदी महाकुंभात सामान्यांप्रमाणे वावरत आहेत.
सचिन मोदी(Sachin Modi) आपल्या मित्रांसह महाकुंभाच्या पवित्र वातावरणात पूर्णपणे तल्लीन झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी आपल्या मित्रांसोबत संत कबीरांची भजने गायली. पंतप्रधानांचे पुतणे असूनही ते सामान्यांप्रमाणे वावरत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदीही दिसत आहेत.
પ્રયાગરાજ: મહાકુંભ મેળામાં નરેન્દ્ર મોદીના ભત્રીજા સચિન મોદીએ ભજન લલકાર્યા, જુઓ વીડિયો#SachinModi#Pmmodinephew#Sachinmodimahakumbh#MahaKumbh2025pic.twitter.com/qrEm4buEZy
— MG Vimal - વિમલ પ્રજાપતિ (@mgvimal_12) January 19, 2025
यावेळी महाकुंभात सहभागी होण्यासाठी गुजरातमधून भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यापैकी सचिन मोदींनी कुटुंब आणि मित्रांसह प्रयागराज गाठले. सचिन मोदी हा 'श्रीराम सखा मंडळ' नावाच्या ग्रुपचा सदस्य आहेत. या ग्रुपचे अनेकजण कुंभमेळ्यात आले आहेत. हा ग्रुप दर शनिवारी अहमदाबाद आणि गांधीनगरमधील विविध ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जातो. या गटात डॉक्टर, अभियंता आणि चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.