महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:50 IST2025-01-31T11:47:40+5:302025-01-31T11:50:46+5:30
...यातच आता महाकुंभ मेळ्यात एन्ट्री झाली आहे ती, एका एअर होस्टेसची. सर्वकाही सोडून साध्वी होण्याची हिची इच्छा आहे.

महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातून रोजच्या रोज नव नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. व्हारल होत आहे. या मेळ्यातून यापूर्वी, आयआयटी बाबा अभय सिंह, यानंतर हर्षा रिछारिया आणि नंतर माळा विकणारी तरुणी मोनालिसाची चर्चा झाली. यांचे व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. यातच आता महाकुंभ मेळ्यात एन्ट्री झाली आहे ती, एका एअर होस्टेसची. सर्वकाही सोडून साध्वी होण्याची हिची इच्छा आहे.
...यानंतर, तिच्या जिवनात मोठा बदल झाला आणि ती आध्यात्माच्या मार्गावर आली -
या एयर होस्टेसचे नाव आहे डिजा शर्मा. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात तिच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा. कपाळावर चंदन आणि अंगावर भगवे वस्त्र दिसत आहेत. डिजा शर्मा स्पाइसजेट कंपनीमध्ये एअर होस्टेस होती. ती सांगते, साधारणे सहा महिन्यांपूर्वी, तिच्या आईचे निधन झाले होते. यानंतर, तिच्या जिवनात मोठा बदल झाला आणि ती आध्यात्माच्या मार्गावर आली.
साध्वी होण्याची इच्छा -
डिजा शर्माने दावा केला आहे की, तिने एका गुरूकडे आणि गुरुमातेकडे साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी आपले वय फार कमी असल्याचे सांगत याला नकार दिला. महाकुंभ मेळ्यात डिजा शर्मा जेथे जाते, तेथे गर्दी होत आहे. लोक तिच्यासोबत सेल्फे घेऊ लागतात. एका यू-ट्यूब चॅनलवर तिची एक मुलाखतही जबरदस्त व्हायरल होत आहे. यात तिने हर्षा रिछारियासंदर्भातही भाष्य केले आहे. ती म्हणाली, हर्षा रिछारियासारखे होण्याची माझी इच्छा नाही आणि मी तिच्या प्रमाणे दिसतही नाही. ती अॅक्ट्रेस आणि इन्फ्लुएन्सर आहे.
डिजा शर्माचे व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. तत्पूर्वी, हर्षा रिचारिया तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तथापि, आपण साध्वी नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.