शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

Madhya Pradesh: अखेर कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:46 PM

मध्यप्रदेशला पराभूत करून भाजपला वाटत, ते विजयी होतील. मात्र त्यांना कधीही यश मिळणार नसल्याची टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली.

नवी दिल्ली - मध्यप्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर कमलनाथ यांनी आजअखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मध्यप्रदेशात कमळ फुलणार की कमलनाथ आपली सत्ता कायम राखणार यावर तर्कवितर्क लढवले जात होते. याला आज पूर्णविराम मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष सत्र आज बोलविण्यात आले आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने माघार घेतल्याचे चित्र होते. काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता कमलनाथ यांनी आपण राज्यपालांकडे राजीनामा सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले.

 

राज्यातील काँग्रेस सरकारमधील 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेशात मोठा राजकीय भूकंप झाला होता. विधानसभा अध्यक्षांनी 22 पैकी सहा आमदारांचे राजीनामा मंजूर केले होते. त्यानंतर उर्वरित 16 आमदारांचे देखील राजीनामे मंजूर कऱण्यात आले. कमलनाथ सरकारला चार अपक्ष, दोन बसपा आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदारांचे समर्थन आहे. मात्र सरकार टीकवण्यासाठी हे पुरेस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. 

दरम्यान मध्यप्रदेशला पराभूत करून भाजपला वाटत, ते विजयी होतील. मात्र त्यांना कधीही यश मिळणार नसल्याची टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह