'या' कंपनीनं कमालच केली राव! 28 कर्मचाऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गिफ्ट म्हणून थेट वन BHK घर दिलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:56 PM2021-03-22T15:56:55+5:302021-03-22T15:57:45+5:30

Madhya Pradesh : या कर्मचाऱ्यांना सागौर कुटीच्या टाऊनशिपमध्ये वन बीएचके रो हाऊस भेट दिली आहे.

Madhya Pradesh : a company gave one bhk house in a gift to 28 employees know what was the condition and whose dream was fulfilled | 'या' कंपनीनं कमालच केली राव! 28 कर्मचाऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गिफ्ट म्हणून थेट वन BHK घर दिलं!!

'या' कंपनीनं कमालच केली राव! 28 कर्मचाऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गिफ्ट म्हणून थेट वन BHK घर दिलं!!

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक योजना तयार केली होती, ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारले.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहराजवळील औद्योगिक क्षेत्र पिथमपूरमधील वस्त्रोद्योग (टेक्सटाइल) कंपनी प्रतिभा सिंटेक्स लिमिटेडने 25 हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या आपल्या 28 कर्मचार्‍यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या कर्मचाऱ्यांना सागौर कुटीच्या टाऊनशिपमध्ये वन बीएचके रो हाऊस भेट दिली आहे. तसेच, या घरांची संपूर्ण संपूर्ण किंमत कंपनीच देणार आहे. विशेष म्हणजे, या कंपनीच्या 28 कर्मचार्‍यांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे. (Madhya Pradesh : a company gave one bhk house in a gift to 28 employees know what was the condition and whose dream was fulfilled)

दरम्यान, कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक योजना तयार केली होती, ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारले. यात जवळपास सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वप्न हे स्वत:च्या घराचे असल्याचे सांगितले होते. यानंतर, कंपनीने सात वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणारे आणि वर्तवणूक चांगली असलेल्यांची निवड केली. ज्यांच्याजवळ स्वतःचे घर नव्हते. कंपनीच्यावतीने त्यांना घराच्या चाव्या सोपविण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष एस.के. चौधरी यांचे वडील छोगमल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट देण्यात आली.

"आमचे ध्येय कर्मचार्‍यांना फक्त कंपनीशीच नव्हे तर भावनिक मार्गाने जोडण्याचे आहे. त्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचे स्वप्न पूर्ण करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे, कारण माझे कर्मचारी माझा अभिमान आहेत. यामुळेच विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविणार्‍या कर्मचार्‍यांच्या 65 मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली गेली आहे, तसेच 20 वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचार्‍यांनाही गौरविण्यात आले आहे", असे एस.के. चौधरी यांनी सांगितले. 

याचबरोबर, आपले घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे कर्मचारीही भावूक झाले. "आम्हाला नेहमीच वाटत होतं की आपलं स्वतःचं घर असावं, पण इतक्या कमी पगारामध्ये ते शक्य झालं नाही, कंपनीने माझं स्वप्न पूर्ण केलं, या बहुमूल्य भेटीसाठी मी कंपनी व्यवस्थापनाला मनापासून मनापासून धन्यवाद देतो", असे कंपनीतील कर्मचारी राजेश प्रसाद यांनी सांगितले.

दुसरीकडे, कोरोना संकट काळात कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. इतर व्यापाऱ्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी. आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच आमच्या कंपनीत काम करणाऱ्यांच्या गरजा भागविणे ही आपली जबाबदारी आहे, असे पिथमपूर इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. गौतम कोठारी म्हणाले.

सुरतमधील व्यावसायिकाने आपल्या कर्मचार्‍यांना दिले होते 400 फ्लॅट्स! 
याआधी गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी काही वर्षांपूर्वी दिवाळीसाठी बोनस म्हणून आपल्या कर्मचार्‍यांना 400 फ्लॅट्स आणि 1,260 कार भेट दिल्या होत्या. कर्मचार्‍यांना भेटवस्तू देण्याच्या बाबतीत ढोलकिला हे नेहमीच काहीतरी नवीन करतात, मात्र, आता पिथमपूरचे व्यापारी देखील ढोलकिया यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. हे कर्मचार्‍यांच्या हितासाठी चांगले आहे.
 

Web Title: Madhya Pradesh : a company gave one bhk house in a gift to 28 employees know what was the condition and whose dream was fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.