CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:06 PM2020-08-03T20:06:40+5:302020-08-03T20:23:13+5:30

कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

madhya pradesh cm shivraj singh chouhan corona report again positive will remain in hospital | CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात

CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात

googlenewsNext
ठळक मुद्देशिवराज सिंह चौहान हे भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात 25 जुलैपासून उपचार घेत आहेत.शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

भोपाळ - गेल्या महिन्यात देशातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे. ते गेल्या नऊ दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासूनच शिवराज सिंह रुग्णालयात आहेत.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. शिवराज सिंह चौहान हे भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात 25 जुलैपासून उपचार घेत आहेत.

मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारीही पॉझिटिव्ह आला. यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागेल.’ 

चौहान यांनी रविवारी ट्विट करून सांगितले होते, की ‘आज माझा रुग्णालयातील नववा दिवस आहे. मी स्वस्थ आहे, कोरोना व्हायरसचे कसलेही लक्षण नाही. रविवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी माझा नमुना घेण्यात आला. रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर उद्या रुग्णालयातून सुट्टी मिळून जाईल.’ 

चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयाने जारी केल्या बुलेटिननुसार, रविवारी चौहान यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांची प्रकृती सामान्य आहे.

अमित शाह रुग्णालयात -
तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतःच एक ट्विट करून दिली होती. यानंतर शिवराज सिंहांनी ट्विट करत, "अमित शाह जी, ईश्वर आपल्याला लवकरात लवकर पूर्णपणे ठणठणीत करो आणि आपण पूर्ण शक्तीनीशी देश सेवेच्या कार्यात येवोत. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत,'' असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Web Title: madhya pradesh cm shivraj singh chouhan corona report again positive will remain in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.