lucknow yogi government will give forceful retirement to up police | योगी सरकार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना देणार सक्तीची सेवानिवृत्ती

योगी सरकार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना देणार सक्तीची सेवानिवृत्ती

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याची कारवाई सुरू केली आहे. अशा भ्रष्टाचारी पोलिसांची यादी पाठविण्यासाठी डीजीपी मुख्यालयाने सर्व पोलीस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि एडीजी झोनच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. पत्रात 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॉन्स्टेबल ते इन्स्पेक्टर या रँकमधील पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्तीही दिली जाईल. दुसरीकडे योगी सरकारच्या या मोठ्या कारवाईनंतर यूपी पोलिसांमधील भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याचं निश्चित मानले जात आहे. ज्या पोलिसांनी 31 मार्च 2020 रोजी वयाची 50 वर्षे पार केलेली आहेत, त्यांना घरी बसवलं जाऊ शकतं. 

योगी सरकारने यादी तयार करण्याचे दिले आदेश 
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, लवकरच उत्तर प्रदेश सरकार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली. अपेक्षेनुसार काम न करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल. मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव आणि सर्व विभागांच्या सचिवांना वयाची 50 वर्षे ओलांडलेल्या कर्मचा-यांच्या कामाचा आढावा घेण्यास सांगितले आहे. अशा कर्मचार्‍यांची यादीही 31 जुलैपर्यंत तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारनेही 'सक्तीची सेवानिवृत्ती' दिली होती
मिळालेल्या माहितीनुसार, अशा अधिका-यांची ओळख पटवली जात आहे, ज्यांना सक्तीचे सेवानिवृत्ती दिली जाईल. यात 17 समीक्षा अधिकारी, आठ विभाग अधिकारी, तीन सचिव आणि दोन उपसचिवांचा समावेश आहे. मागील तपास, त्यांच्यावर दाखल केलेल्या कारवाई आणि फौजदारी खटल्यांचा तपशील गोळा केला जात आहे, जेणेकरून त्यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध होऊ शकेल. यापूर्वी केंद्र सरकारने 15 वरिष्ठ आयटी अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lucknow yogi government will give forceful retirement to up police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.