शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:23 IST

वडिलांनी २२ दिवसांपूर्वीच मुलाला वाढदिवसाला बुलेट भेट दिली होती.

लखनौच्या आशियाना परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. हसतं खेळतं घर अपघातामुळे उद्ध्वस्त झालं आहे. बुलेट आणि खासगी बसच्या धडकेत अकरावीचा विद्यार्थी वैभव झा (१७) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र शाश्वत गंभीर जखमी झाला. सकाळी ७:१५ च्या सुमारास वैभव त्याच्या छोट्या बहिणीला शाळेत सोडून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. वैभव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांनी त्याला २२ दिवसांपूर्वीच त्याच्या वाढदिवसाला बुलेट भेट दिली होती. आज त्याच बुलेटमुळे त्याने आपला जीव गमावला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला शाळेत सोडल्यानंतर वैभव त्याच्या बुलेटने पुढे जात असताना एका खासगी बसने रिव्हर्स घेतला. यामुळे बुलेटच्या मागच्या भागावर बस जोरात आदळली. यामुळे वैभव बसखाली आला. स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत वैभवचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मित्र शाश्वत रस्त्यावर वेदनेने तडफडत होता. शाश्वतने हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला.

अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु एका ऑटो चालकाच्या सतर्कतेमुळे त्याला काही अंतरावर लोकांनी बस चालकाला पकडलं. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. आशियाना पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमीला रुग्णालयात पाठवलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

वैभवच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील संतोष कुमार यांनी त्याला चांगले गुण मिळाल्यास बुलेट गिफ्ट देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या महिन्यात निकालानंतर एक बुलेट खरेदी केली होती. वडिलांनी वाढदिवशी म्हणजेच २२ दिवसांपूर्वी गिफ्ट दिली होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, वैभव क्वचितच बुलेट चालवत असे. तो अल्पवयीन होता, म्हणून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्याच्या कुटुंबाने त्याला सुरक्षिततेसाठी हेल्मेट देखील दिले होते, मात्र आता अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Gifted Bullet Claims Teen's Life in Lucknow Accident

Web Summary : Lucknow: A 17-year-old died in a bus collision while riding a bullet gifted by his father. His friend was injured. The bus driver was arrested after attempting to flee. The boy received the bike after excelling in exams.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस