LPG vs PNG: पीएनजी कनेक्शन कसं घ्यायचं? जाणून घ्या सिलिंडर स्वस्त पडतो की पाइपलाइन गॅस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:10 IST2026-03-16T16:09:14+5:302026-03-16T16:10:44+5:30

How to get PNG Connection: मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. अशा वेळी पीएनजी (पाइपलाइन गॅस) हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

LPG vs PNG: Which is Cheaper? How to get LPG Gas Connection | LPG vs PNG: पीएनजी कनेक्शन कसं घ्यायचं? जाणून घ्या सिलिंडर स्वस्त पडतो की पाइपलाइन गॅस!

LPG vs PNG: पीएनजी कनेक्शन कसं घ्यायचं? जाणून घ्या सिलिंडर स्वस्त पडतो की पाइपलाइन गॅस!

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारताच्या तेल आणि गॅस पुरवठा साखळीवर होताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे त्रस्त झालेले नागरिक आता पीएनजी कनेक्शनकडे वळताना दिसत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत ग्राहक एलपीजी आणि पीएनजी दोन्ही पर्यायांची तुलना करत आहेत. एलपीजी सिलिंडर संपल्यावर बुकिंग करावे लागते आणि सध्याच्या स्थितीत डिलिव्हरीला विलंब होत आहे. पाइपलाइनद्वारे थेट घरात पुरवठा होत असल्याने गॅस संपण्याची भीती नसते आणि २४ तास गॅस उपलब्ध राहतो. दरम्यान, १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या ₹८०० ते ₹११०० च्या दरम्यान आहे. याउलट, पीएनजीचा दर प्रति युनिट ₹४० ते ₹६० दरम्यान असून, तुम्ही जेवढा गॅस वापराल तितकेच बिल भरावे लागते. जास्त वापर असलेल्या कुटुंबांसाठी पीएनजी दीर्घकाळात स्वस्त पडते.

पीएनजी कनेक्शन कसे मिळवाल?

- सर्वात प्रथम, तुमच्या भागात संबंधित गॅस वितरण कंपनीची पाइपलाइन आहे का, याची खात्री करा.
- त्यानंतर, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा.
- पुढे, आधार कार्ड, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा.
- अर्जाची पडताळणी झाल्यावर कंपनीचा तंत्रज्ञ येऊन मीटर आणि पाइपलाइन बसवून जातील.
- त्यानंतर, काही दिवसांत गॅस पुरवठा सुरू होईल.

Web Title : एलपीजी बनाम पीएनजी: कनेक्शन लें, सिलेंडर सस्ता या गैस पाइपलाइन?

Web Summary : एलपीजी डिलीवरी में देरी के कारण उपभोक्ता पीएनजी की ओर रुख कर रहे हैं। पीएनजी 24/7 आपूर्ति प्रदान करता है, बुकिंग की झंझट खत्म करता है। एलपीजी की कीमत ₹800-₹1100 है, जबकि पीएनजी दरें ₹40-₹60 प्रति यूनिट हैं। पीएनजी भारी उपयोगकर्ताओं के लिए सस्ता है। आईडी और पते के प्रमाण के साथ ऑनलाइन आवेदन करें।

Web Title : LPG vs PNG: Get Connection, Cheaper Cylinder or Gas Pipeline?

Web Summary : LPG delivery delays are pushing consumers to PNG. PNG offers 24/7 supply, eliminating booking hassles. While LPG costs ₹800-₹1100, PNG rates are ₹40-₹60 per unit. PNG is cheaper for heavy users. Apply online with ID and address proof.