LPG Gas Booking: गॅस जपून वापरा! आता दुसरा सिलिंडर २५ दिवसांनंतरच बुक करता येणार; युद्धाचे परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:06 IST2026-03-09T14:06:00+5:302026-03-09T14:06:22+5:30

LPG Cylinder Booking Waiting period new Rules: गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! आता २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. गॅस बुकिंगच्या नियमात झालेला हा मोठा बदल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

LPG Gas Booking Waiting period new Rules: Use gas carefully! Now the second cylinder can be booked only after 25 days; Results of the war? | LPG Gas Booking: गॅस जपून वापरा! आता दुसरा सिलिंडर २५ दिवसांनंतरच बुक करता येणार; युद्धाचे परिणाम?

LPG Gas Booking: गॅस जपून वापरा! आता दुसरा सिलिंडर २५ दिवसांनंतरच बुक करता येणार; युद्धाचे परिणाम?

LPG Gas Booking: घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता दोन सिलिंडर बुक करण्यामध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गॅसचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.

युद्धामुळे एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यामुळे हॉटेल, कंपन्यांसाठीच्या गॅसवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती देखील ६० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांकडून साठा करण्याची किंवा हे सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामुळे अचानक कंपन्यांनी आधीचा १५ दिवसांचा वेटिंग पिरिएड आता थेट २५ दिवसांवर नेऊन ठेवला आहे. 

७ मार्चपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत. अनेकांकडे एकापेक्षा जास्त गॅस जोडणी आहेत. दोन सिलिंडर असलेल्यांकडे एक सिलिंडर रिकामा असतो. त्या ग्राहकांनी दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा १५ दिवसांचा मेसेज दाखविण्यात येत होता. परंतू, १६-१७ दिवस होऊनही सिलिंडर बुक होत नव्हता. अखेर ९ मार्चला कंपन्यांनी सिलिंडर डिलिव्हरीपासून २५ दिवसांचा गॅप असल्याचा मेसेज दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे एखादा ग्राहक २५ दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचे बुकिंग सिस्टिम स्वीकारणार नाही. गॅस सिलिंडर मागणीमुळे वाढलेला दबाव कमी करण्यासाठी कंपन्यांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे. 

महत्त्वाचे बदल...

  • २५ दिवसांचे अंतर: एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर पुढचे बुकिंग करण्यासाठी २५ दिवस थांबावे लागेल.
  • काळ्याबाजारावर लगाम: घरगुती सिलिंडरचा हॉटेल किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी होणारा वापर कमी होईल.
  • डिलिव्हरी सिस्टिममध्ये सुधारणा: रांगेत असलेल्या ग्राहकांना आता अधिक जलद गतीने सिलिंडर मिळणे शक्य होईल.

Web Title : गैस का इस्तेमाल समझदारी से करें! अब 25 दिनों बाद सिलेंडर बुक करें।

Web Summary : नए नियमों के अनुसार, एलपीजी सिलेंडर बुकिंग के बीच 25 दिनों का अंतर अनिवार्य है। इसका उद्देश्य गैस की कमी और मूल्य वृद्धि के बीच कालाबाजारी को रोकना है, जिससे घरेलू उपभोक्ताओं पर असर पड़ेगा। यह बदलाव 7 मार्च से प्रभावी है।

Web Title : Use gas wisely! Book next cylinder after 25 days now.

Web Summary : New rules require a 25-day gap between LPG cylinder bookings. This aims to curb black marketing amid gas shortages and price hikes, impacting household consumers. The changes are effective since March 7th.