शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, लग्न आणि अवघ्या चार महिन्यात मर्डर... पतीनेच केली पत्नीची हत्या, इंजेक्शन दिलं आणि...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:18 IST

Crime News: प्रेमात पडून लग्न केल्यानंतर पतीने अवघ्या चार महिन्यांनंतर पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील गढी हरसरू गावात घडली आहे. काजल असं या मृत महिलेचं नाव असून, तिचा पती अरुण शर्मा याने अॅनेस्थीशियाचा ओव्हरडोस असलेलं इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचे उघडकीस आलं आहे.

प्रेमात पडून लग्न केल्यानंतर पतीने अवघ्या चार महिन्यांनंतर पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील गढी हरसरू गावात घडली आहे. काजल असं या मृत महिलेचं नाव असून, तिचा पती अरुण शर्मा याने अॅनेस्थीशियाचा ओव्हरडोस असलेलं इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अरुण याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय काजल ही नर्स होती. तर अरुण हा एका खाजगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन होता. तिथेच त्यांनी भेट झाली होती. काजल आणि अरुण सुरुवातीला एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर कुटुबीयांच्या सहमतीने नोव्हेंबर महिन्यात त्यांचं लव्ह कम अरेंज मॅरेज झालं होतं.

मात्र काही दिवसांमध्येच अरुण याला व्यसन करण्याची सवय असल्याचे, तसेच ही बाब तो आपल्यापासून लपवत असल्याचे काजल हिच्या लक्षात आले. दरम्यान, १८ मार्च रोजी सकाळी अरुण याने काजल हिला इंजेक्शनच्या माध्यमातून अॅनेस्थिशियाचा ओव्हरडोस दिला. तसेच घरातून फरार झाला. 

हा प्रकार घडला तेव्हा काजल घरात एकटीच होती. काही वेळाने जेव्हा कुटुंबीय खोलीत पोहोचले तेव्हा काजल ही जमिनीवर पडलेली आढळली. तसेच तिच्या नाकामधून रक्त वाहत होते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र तिथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तसेच संशयाच्या आधारावर पती अरुण शर्मा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी अरुणवर अटकेची कारवाई केली. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Love, Marriage, Murder in Four Months: Husband Kills Wife

Web Summary : In Gurugram, a husband murdered his wife of four months by injecting her with an anesthesia overdose. The victim, Kajal, was a nurse. Her husband, Arun, a lab technician, confessed to the crime after being arrested. Police are investigating the motive.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा