लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:20 PM2020-05-27T18:20:05+5:302020-05-27T18:22:15+5:30

भारतासह जगभरात मार्चपासून घरातून काम करण्यास सुरुवात झाली आहे. कारण तेव्हाच जागतिक लॉकडाऊनला सुरुवात झाली होती.

lottery! google will pay Rs 75,000 to the employee who Work from Home hrb | लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार

लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार

Next

कोरोना व्हायरसमुळे जगातील जवळपास सर्वच कंपन्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगत आहेत. फेसबुकने तर निम्म्या कर्मचाऱ्यांना पुढील १० वर्षे घरातूनच काम करण्याची ऑफर देऊ केली आहे. आता या Work from Home मध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या यादीत आणखी एका जगज्जेत्या कंपनीची भर पडली आहे. 


भारतासह जगभरात मार्चपासून घरातून काम करण्यास सुरुवात झाली आहे. कारण तेव्हाच जागतिक लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. गुगलने सांगितले की, जुलैमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविण्यास सुरुवात केली जाणार आहे. मंगळवारी कंपनीने याबाबतचे पत्रक काढले आहे. यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, ६ जुलैपासून कंपनी वेगवेगळ्या शहरातील कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचारी बोलविणार आहे. जर सारेकाही ठीक राहिले तर सप्टेंबरपर्यंत ३० टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलविले जाणार आहे. 


याचबरोबर जे कर्मचारी घरून काम करत आहेत, त्यां ना कंपनीकडून १००० डॉलरचा भत्ता देण्यात येणार आहे. ही रक्कम त्या त्या देशातील चलनामध्ये रुपांतरीत करून दिली जाणार आहे. म्हणजेच भारतीय कर्मचाऱ्यांना ७५ हजार रुपये मिळणार आहेत. घरून काम करत असताना कर्मचाऱ्यांना फर्निचर, साहित्याची गरज लागली असणार. जवळपास पूर्ण वर्षभर या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावे लागणार आहे. यासाठी गरजेच्या वस्तू लागतील म्हणून हा भत्ता देण्यात येणार आहे.

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले की, खूपच कमी लोकांना कार्यालयात बोलावले जाणार आहे. कंपनीचे अधिकाधिक कर्मचारी घरातूनच काम करणार आहेत. ज्यांना कार्यालयात येणे गरजेचे आहे त्यांना रोटेशन पद्धतीने बोलावले जाईल. सध्या सोशल डिस्टन्सिंग खूप महत्वाचे आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय

SBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले

चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली

थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात

प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर

धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

Web Title: lottery! google will pay Rs 75,000 to the employee who Work from Home hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.