loose sweets to have expiry dates from 1 june 2020 SSS | मिठाईबाबतचा नवा नियम जाणून घ्या अन् बिनधास्त तोंड गोड करा

मिठाईबाबतचा नवा नियम जाणून घ्या अन् बिनधास्त तोंड गोड करा

ठळक मुद्देमिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे.FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार.

नवी दिल्ली - सण, समारंभ अथवा घरामध्ये एखादं शुभ कार्य असल्यास तोंड गोड करण्यासाठी हमखास मिठाई आणली जाते. मात्र अनेकदा मिठाईमध्ये भेसळ असणं किंवा ती जुनी असल्याने तशी मिठाई खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र आता मिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे. तसेच मिठाई कधी तयार करण्यात आली आणि ती कधीपर्यंत खाणं योग्य आहे याबाबतची सर्व माहिती ही लवकरच ग्राहकांना मिळणार आहे. 

सुट्या किंवा पॅकबंद नसलेल्या मिठाईच्या दर्जाबाबत ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी सरकारने अशी पावलं उचल्याची माहिती मिळत आहे. FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. त्यामुळे मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय त्यांना मिठाई विकता येणार नाही. पॅकबंद नसलेल्या गोड पदार्थांची विक्री करताना ते पदार्थ कधी तयार केले याची तारीख तसेच किती तारखेपर्यंत वापरावेत याचा ठळक उल्लेख करणे. FSSAI बंधनकारक केले आहे. 

अनेकदा मुदत संपलेल्या वस्तू या विकल्या जातात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. हाच धोका लक्षात घेऊन FSSAI ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी देशातील सर्व मिठाई विक्रेत्यांना ही मिठाई कधी तयार केली व किती तारखेपर्यंत वापरता येतील, या दोन्ही तारखांचा उल्लेख त्या पदार्थांच्या दुकानात मांडल्या जाणाऱ्या ट्रेवर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. 

जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन तुम्हाला माहीत आहे का?

मिठाईच्या शौकीनांना नेहमीच मिठाईंबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. अशीच मिठाईबाबतची एक खास बाब आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत. अनेकांना माहीत नसेल की, जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन किती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सर्वात हलक्या मिठाईचं वजन केवळ 1 ग्रॅम आहे आणि यात 90 टक्के केवळ हवा आहे. म्हणजे या मिठाईने तोंड गोड करण्यासाठी यात केवळ 4 टक्के पदार्थ टाकले आहेत. ब्रिटनच्या कारागिरांनी ही मिठाई तयार केली आहे. खास बाब ही आहे की, या मिठाईला तयार करण्यासाठी वैज्ञानिकांची खास मदत घेण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

 

English summary :
Display of 'best before date' on non-packaged sweets must from June: FSSAI. loose sweets to have expiry dates from 1 june 2020

Web Title: loose sweets to have expiry dates from 1 june 2020 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.