Know all about worlds lightest dessert it is 96 percent air and weighs just one gram | जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन तुम्हाला माहीत आहे का?
जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन तुम्हाला माहीत आहे का?

मिठाईच्या शौकीनांना नेहमीच मिठाईंबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. अशीच मिठाईबाबतची एक खास बाब आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत. अनेकांना माहीत नसेल की, जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन किती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सर्वात हलक्या मिठाईचं वजन केवळ १ ग्रॅम आहे आणि यात ९० टक्के केवळ हवा आहे. म्हणजे या मिठाईने तोंड गोड करण्यासाठी यात केवळ ४ टक्के पदार्थ टाकले आहेत.

कारागिरांनी आणि वैज्ञानिकांनी मिळून तयार केली मिठाई

ब्रिटनच्या कारागिरांनी ही मिठाई तयार केली आहे. खास बाब ही आहे की, या मिठाईला तयार करण्यासाठी वैज्ञानिकांची खास मदत घेण्यात आली आहे. लंडनमधील डिझाइन स्टुडिओ Bompass अ‍ॅन्ड Parr च्या कारागिरांनी एरोजेलेक्स लेबॉरेटरीच्या वैज्ञानिकांसोबत जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये ही मिठाई तयार केली आहे. ही मिठाई तयार करण्यासाठी सर्वात हलक्या टणक पदार्थाला आधी खाण्या लायक करण्यात आलं आणि त्यात गोड पदार्थ टाकण्यात आला. 

ऐरोजेलपासून तयार केली मिठाई

एरोजेलचा आविष्कार १९३१ मध्ये झाला होता. अमेरिकेतील वैज्ञानिक सॅम्युअल किस्टलर यांनी हे तयार केलं होतं. सॅम्युअल आणि त्याचे सहकारी वैज्ञानिक चार्ल्स यांच्या शर्यत लागली होती. दोघांनी एकमेकांना चॅलेन्ज केलं होतं की, कोण जेलमधील हवेला पाण्यात बदलू शकतं. यातूनच ऐरोजेलचा आविष्कार झाला होता. यात ९५ ते ९९.८ टक्क्यापर्यंत हवा असते. आणि हा जगातला सर्वात हलका ठोस पदार्थ आहे.


Web Title: Know all about worlds lightest dessert it is 96 percent air and weighs just one gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.