दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:03 IST2025-10-17T18:49:41+5:302025-10-17T19:03:56+5:30
तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी काजल नावाच्या तरुणीला अटक केली आहे.

दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
एक तरुणी दिसायला अत्यंत सुंदर होती. तिच्या सौंदर्यामुळे अनेक तरुण तिच्याकडे पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडत. पण, ती आपल्या सौंदर्याचा वापर करून मुलांना फसवत होती. ती लग्नाचे आश्वासन देऊन त्यांच्याशी बोलायची आणि विश्वास संपादन करायची.
या तरुणीचं नाव काजल आहे. तिच्यावर तरुणांना फसवून लग्न करण्याचा बहाणा करत पैसे, दागिने आणि कपडे घेऊन पळून जाण्याचा गंभीर आरोप आहे.
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
काजल आणि तिचं कुटुंब अशा मुलांना लक्ष्य करत असे जे काही कारणांमुळे लग्न करू शकत नव्हते. सध्या काजलची गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
फोटोमध्ये दोन पोलिसांच्या मध्ये बसलेली दिसणारी हीच सुंदर तरुणी म्हणजे काजल. तिची गोष्ट ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. तिने अनेक तरुणांशी प्रेमाचे नाटक केले, लग्न केले आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली. काजल आणि तिच्या कुटुंबाने चार-पाच राज्यांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचं, सांगितलं जातं.
मथुरा पोलिसांनी काजलला अटक केली आहे. तिच्यावर श्रीमंत, अविवाहित तरुणांना फसवण्याचे आरोप आहेत. ती त्यांच्या प्रेमात पडल्याचे नाटक करून लग्न करायची, आणि नंतर त्यांच्या कुटुंबाकडून दागिने व पैसे घेऊन फरार व्हायची. आतापर्यंत तिने दहा हून अधिक तरुणांना फसवल्याचे समोर आले आहे.
आई- वडिलांचाही फसवणुकीत सहभाग
काजलचे वडील भगतसिंह आणि आई सरोज देवी यांनीही या फसवणुकीत तिची साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांना यापूर्वीच अटक करून तुरुंगात पाठवले होते. आता काजललाही गुरुग्राम येथे पकडण्यात आले आहे. पोलिस जेव्हा तिच्यापर्यंत पोहोचले तेव्हा ती हसत होती, आणि तिच्या हातांवर नववधूसारखी मेहंदी होती.