शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 08:42 IST

मंगळसूत्र बनला निवडणूक मुद्दा, केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे

संजय शर्मा नवी दिल्ली : निवडणुकीत राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे निवडणुकीचे मुद्दे बनताना दिसत नाहीत. मतदार अजूनही जातीबाबत अधिक जागरूक आहेत. निवडणूक आणि मतदान या दोन्हींवर जातीवादाचे वर्चस्व आहे. 

अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार या घोषणा भाजपने दिल्या. पण, दुसऱ्या टप्प्यापूर्वी यावरून काळजी वाढली आहे. २०१९ च्या निवडणुकांप्रमाणेच खूप प्रयत्न करूनही निवडणुका राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत नाहीत.  आतापर्यंत जे कल आले आहेत, त्यावरून असे दिसून येत आहे की, जातीवादाचा प्रभाव मतदारांवर अधिक प्रमाणात आहे. 

निवडणुकीत नेमका मुद्दा काय चालतोय?केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे. राष्ट्रीय मुद्दे सीएए, एनआरसी, राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तान, कलम ३७०, समान नागरी कायदा, देशाचा विकास, जी २० हे अद्याप निवडणुकीचे मुद्दे बनलेले नाहीत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये राम मंदिर अग्रस्थानी होते, पण आजपर्यंत राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही. त्याऐवजी, यादव, जाट, गुर्जर, मीणा, राजपूत, कुशवाह, कुर्मी, जाटव, रेड्डी, लिंगायत, वोकलिंगा समाजातील असणे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. हा मुद्दा मतदारांना थेट उमेदवारांशी जोडणारा आहे, असे चित्र पहायला मिळत आहे.

भाजप म्हणते काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगचाकाँग्रेसच्या जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मुस्लीम लीगचा जाहीरनामा म्हणत आहे. काँग्रेस लोकांचे सोने, चांदी आणि मंगळसूत्रही हिसकावून घेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याच्या वक्तव्यानंतर भाजपला काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची जोरदार संधी मिळाली आहे.

भाजपकडे मोठा मुद्दा...मंगळसूत्र आणि मालमत्ता वाटप हे दोन्ही निवडणुकीचे मुद्दे बनले आहेत. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याला वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती मोठा मुद्दा मिळाला आहे. याचे भांडवल करण्याची सर्व नेत्यांची तयारी सुरू आहे. भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री, नेते एकाच सुरात काँग्रेसच्या या विधानाचा विरोध करत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा