शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लोकपालांच्या हॉटेलचे महिन्याचे बिल 50 लाख; चौकशी एकाही तक्रारीची नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:47 PM

सरकारी नोकरदारांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी लोकपालची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनांनंतर केंद्र सरकारने लोकपालाची नियुक्ती केली खरी पण त्यांच्यासाठी देशाच्या राजधानीत ना कार्यालय ना रहायला घर अशी अवस्था आहे. यामुळे लोकपालांना फाईव्ह स्टार हॉटेलमधूनच काम करावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे या हॉटेलचा महिन्याचे बिल तब्बल 50 लाखांचे भरावे लागत आहे. 

सरकारी नोकरदारांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी लोकपालची नियुक्ती करण्यात आली आहे. या लोकपालना कोणते अधिकार दिलेत यावरून वाद असताना त्यांना स्वत:चे कार्यालयच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांना सरकारच्या मालकीचे हॉटेल अशोकातच काम करावे लागत आहे. लोकपालांची राहण्याची, भोजनाची आणि कामाची व्यवस्था याच हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. यासाठी महिन्याला 50 लाख रुपये मोजले जात आहेत. मार्च 2019 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत डीओपीटीने एकूण 3 कोटी 85 लाखांचे बिल अदा केले आहे. 

मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी सी घोसे यांनी देशाचा पहिल्या लोकायुक्ताची नेमणूक केली. याशिवाय लोकपाल कार्यालयामध्ये सरकारने चार न्यायिक आणि चार अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली. यापासून हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर 12 खोल्यांमध्ये या लोकपालांचा वावर आहे. 

हिंदुस्तान टाईम्सने याबाबते वृत्त दिले आहे. आरटीआय कार्यकर्ता शुभम खत्री यांनी ही माहिती मिळविली आहे. यामध्ये त्यांनी लोकपालांनी आजपर्यंत किती तक्रारींवर कारवाई केली असा प्रश्न विचारला होता. या काळात लोकपालांना 1160 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1000 तक्रारींवर सुनावणी झाली आहे. तसेच या प्रकरणांच्या प्राथमिक चौकशीला सुरूवात झाली आहे. मात्र, सखोल चौकशीला अद्याप सुरूवात करण्यात आली नसल्याचे माहिती अधिकारात समजले आहे.  

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय