शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल जप्त केला म्हणून विद्यार्थाने मुख्याध्यापकाला बदडले लोखंडी रॉडने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 17:35 IST

मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला.

नवी दिल्ली, दि. 12 : शिक्षक म्हणजे, आयुष्याला कलाटणी देणारी, दिशा देणारी, कधी पाठीवर शाबासकीचा हात, तर कधी हातावर छडीचा मार देणारी व्यक्ती. पण गुरुवर्यांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. मोबाईल आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्या घटक बनला असला तरी त्याचा आती वापर धोकादायक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. मोबाईलचे व्यसन लागल्यावर ती व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा भरवसा नाही.नवी दिल्लीत नववीत शिकणाऱ्या विध्यार्थाने लोखंडी रॉडने मुख्याध्यापकांना मारहाण केली असून त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मेवा लाल असे मारहाण करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. मेवा लाल सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शाळेमध्ये देखरेख करत असताना नववीतील एक विद्यार्थी शिक्षक वर्गात शिकवत असताना मोबाईलवर काहीतरी करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेचच त्या मुलाला जवळ बोलावून त्याला ओरडले आणि त्याचा मोबाईल जप्त केला. त्याचबरोबर पालकांना भेटायला घेऊन ये, असे बजावले.संबंधित विद्यार्थ्याने मुख्यध्यापकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व मोबाईल त्यांच्याकडे दिला. पण घडलेल्या प्रकरणाचा राग डोक्यात असल्याने त्याने नंतर शाळेच्या मैदानात मुख्याध्यापकांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे वार त्याने हातापायांवर केले. त्यानंतर तेथे उपस्थित विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी यांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला अडवले. पण जर त्याला अडवले नसते तर माझा जीव देखील गेला असता, असे मेवा लाल यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाCrimeगुन्हाPoliceपोलिस