Punjab General Election 2019: आम्हाला मदत करा, धर्मेंद्र यांचे भावनिक ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 15:15 IST2019-04-29T15:11:44+5:302019-04-29T15:15:33+5:30
देशाच्या हितासाठी आम्हाला मतदान करा. आपल्या पाठिंब्याने होणारा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरेल. गुरदासपुर लोकसभा मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करू, असे भावनिक ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे

Punjab General Election 2019: आम्हाला मदत करा, धर्मेंद्र यांचे भावनिक ट्वीट
मुंबई - बॉलीवूडचे अँग्री यंग मॅन व भाजपाचे माजी खासदार धर्मेंद्र देओल यांचे पुत्र सनी देओलने पंजाबच्या गुरदासपुर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तुमची मदत हवी आहे आम्हाला मदत करा. सनी देओलच्या उमेदवारी अर्ज दाखल करणाच्या काही वेळापूर्वी धर्मेंद्रने भावनिक ट्वीट केले आहे.
राजकरण खूपच घाणरडे झाले आहे.डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीप्रत्यक्षात मात्र वेगळ्या असतात. राजकरणातल आम्हाला जास्त काही कळत नाही. आमच्या साठी भारत देश आई समान आहे. देशाच्या हितासाठी आम्हाला मतदान करा. आपल्या पाठिंब्याने होणारा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरेल. गुरदासपुर लोकसभा मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करू, असे भावनिक ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे.
राजनीति इतनी घिन्नौनि हो चुकी है दोस्तों ... यहाँ A ...Z बन जाती है ....Z .... A हो जता है.... .....हम इस की A B C नहीं जानते .....हाँ... भारत हमारी माँ है ....माँ के लिए हम.......... pic.twitter.com/iupFK1X8yr
— Dharmendra Deol (@aapkadharam) April 29, 2019
राजकरण आमच्या नशिबात होते म्हणून आम्ही यात आलो. राजकरणात आल्यामुळे अनेकांना दुख: झाले असेल. आमच्या बद्दल लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुद्धा होतील. मात्र, बिकानेर मध्ये ५० वर्षात जेवढे कामे झाली नाहीत तेवढी मी ५ वर्षात केली, असा दावा धर्मेंद्रने केला
सिनेअभिनेता आणि भाजपचे दिवंगत नेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी भाजपने गुरदासपुर लोकसभा मतदार संघातून सनी देओलला उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने सुनील जाखड़ यांना रिंगणात उतरवले आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरदासपुर लोकसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत जाखड़ यांनी विजय मिळवला होता.