शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 9:15 PM

देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. (Rahul Gandhi)

नवी दिल्ली - केंद्र सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ‘हम दो, हमारे दो’ (Hum Do Hamare Do) अशी टिप्पणी केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. यावर बोलताना ठाकूर म्हणाले, राहुल यांच्या बोलण्याचा आशय ‘दीदी, जीजाजी आणि त्यांचे कुटुंब’ असा असेल. (Union minister Anurag Thakur attack on Rahul Gandhi)

लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले, राहूल गांधी अर्थसंकल्पावर तयारी करून आले नाही. काँग्रेस नेते सभागृह आणि देशातही कमीच राहतात. तसेच ते हम दो, हमारे दोवर बोलतात, असे म्हणून ते दीदी, जीजाजी तथा मुलांच्या संदर्भात बोलतात, असे ठाकूर म्हणाले.

Rahul Gandhi in Loksabha: लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; राहुल गांधी लोकसभेत गरजले

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो, की ते ज्या दोन उद्योगपती घरांसंदर्भात बोलत आहेत, त्यांना केरळमध्ये काँग्रेस सरकार असताना बंदर का देण्यात आले? हे आपलेच आहेत, आपणच पाळले आहेत.’’

राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘‘असे कुठे लिहिले आहे, की अमेठीतून निवडणूक लढणारे राहुल गांधी निवडणूक हारल्यानंतर वायनाडमधून निवडणूक लढू शकत नाही. ते कुठूनही निवडणूक लढू शकतात. मग, अमेठीतील शेतकरी वायनाडमध्ये आपले पीक का विकू शकत नाही?’’ एवढेच नाही, तर काँग्रेस आणि काही इतर पक्षांचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत,असेही ठाकूर म्हणाले.

यावेळी, अर्थसंकल्प 2021-22 वर बोलताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, या अर्थसंकल्पात आशेचा किरण दिसतो. तसेच यात, देशाला आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच नव्या भारताची रचना करण्यावरही भर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींच्या ‘‘सशक्त भारत’’ विचारानुरूप आहे. एवढेच नाही, तर सर्वच स्थरांतून यांचे कौतुक करण्यात आले आहे.

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

काय म्हणाले होते राहुल गांधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. "देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे. हे फक्त शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचे नाही, तर संपूर्ण देशाचे आंदोलन आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील", असेही राहुल गांधी म्हणाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन